Co-operative Bank elections
Co-operative Bank elections file photo, sarkarnama

ऐन पावसाळ्यात बँकांचे राजकारण चांगलेच रंगणार!

कोरोनामुळे बँकांच्या निवडणुका सतत पुढे जात होत्या, त्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे.

विरार : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या बॅंकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. येत्या जून आणि जुलै महिन्यात त्यांच्या निवडणुका होणार आहेत. आता मतदार याद्या अद्यायावत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या ४ सहकारी बँकांच्या निवडणुका कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून रखडल्या होत्या. त्या बँकांच्या निवडणुकीला आता मुहूर्त मिळाला आहे.

Co-operative Bank elections
बाळासाहेबांसारखीच व्यंगचित्रकलेची ज्यांच्यामध्ये क्षमता होती, त्यांनी भोंग्याचं राजकारण सुरु केलयं!

निवडणुका होणाऱ्या बँकामध्ये वसई विकास सहकारी बँक (Vasai Co-operative Bank),वसई जनता सहकारी बँक (Vasai Janata Sahakari Bank), बेसिन कॅथॉलिक बँक आणि जव्हार अर्बन बँकेचा समावेश आहे. वसई तालुक्यात जसा सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्याच प्रमाणे येथे सहकाराचे जाळे हि मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे.

तालुक्यात सहकार क्षेत्रात 3 मोठ्या बँका कार्यरत आहेत. यामध्ये वसई विकास बँकेची मुदत 27 जुलै 2020 ला संपली होती. वसई जनता बँकेची मुदत 24 मे 2020 ला संपली होती. तर बेसिन कॅथॉलिक बँकेची मुदत 21 जून 2020 ला संपली होती. परंतु वाढत्या कोरोनामुळे तिन्ही बँकांच्या निवडणुका सतत पुढे जात होत्या, त्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. जून आणि जुलै महिन्यात निवडणुका होणार आहेत.

Co-operative Bank elections
मांजरीच्या उपसरपंचावर गोळीबार ;विटा, दगडांनी हल्ला

या निवडणुकीच्या दृष्टीने लागणाऱ्या मतदार याद्यांचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या ख्रिचन समाजाची बँक म्हणून ओळख असलेल्या बेसिन कॅथॉलिक बँकेचा टर्न ओव्हर 12 हजार कोटीच्यावर आहे.

वाढवळ समाजाची बँक म्हणून ओळख असलेल्या वसई विकास बँकेचा टर्न ओव्हर २७०० कोटींचा आहे तर वसई जनता बँकेचा टर्न ओव्हर ११०० कोटींचा आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या या बँकांच्या रखडलेल्या निवडणुकामुळे ऐन पावसाळ्यात बँकांचे राजकारण चांगलेच रंगणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com