आमचा नाद करु नका ; शिवसेनेची पुन्हा डरकाळी, राणांची नौटंकी संपली !

'मातोश्री'ला आव्हान देणारी व्यक्ती अजून जन्माला आलेली नाही.
Navneet Rana, ravi rana, varun sardesai
Navneet Rana, ravi rana, varun sardesaisarkarnama

मुंबई :'मातोश्री'वर हनुमान चालीसा प्रकरणावरुन गेले दोन दिवस सुरु असलेला राडा अखेर थांबला. खासदार नवनीत राणा (Navneet Rana), आमदार रवी राणा (Ravi Rana)यांना शिवसैनिकांनी घराबाहेर पडणं मुश्किल केल्यामुळे राणा दाम्पत्याने आंदोलन मागे घेतले. त्यानंतर शिवसेनेच्या विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई म्हणाले, ''उद्या (ता.२४) मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नियोजित दौरा (PM Narendra Modi Mumbai Visit) असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरीता मागे घेत असल्याचं नवनीत राणे यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात येऊन मातोश्रीला आव्हान देण्याची धमक कुणामध्येही नाही,''

Navneet Rana, ravi rana, varun sardesai
वाजवत बसा घंटा ! शिवसेनेचे हिंदुत्व गदा धारी ; राऊतांचा हल्लाबोल

''मोदींच्या दैाऱ्यामुळे त्यांना कारण मिळालयं. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. तीन दिवसात त्यांची नैांटकी संपली. मातोश्रीला आव्हान देणारी व्यक्ती अजून जन्माला आलेली नाही. नाद कुणाचाही करा. शिवसेनेचा नाद करु नका. यानिमित्ताने पुन्हा एकदा शिवसेनेचे ताकद महाराष्ट्राने पाहिली,'' असे वरुण सरदेसाई म्हणाले.

मातोश्री या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरी येणार हे समजताच शिवसैनिक कालपासून संतापले होते. शिवसेनेची महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले.त्यांनी मातोश्री बाहेर ठिय्या मांडला.आज सकाळीही नऊ वाजण्याच्या सुमारास राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात शिवसैनिक घुसले. त्यानंतर पोलिसांनीही राणा दाम्पत्याला खाली न उतरण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर दुपारी राणा यांनी पत्रकार परिषद हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

Navneet Rana, ravi rana, varun sardesai
राणा यांचा राजकीय प्रवास भाडोत्रीटॅक्सी प्रमाणे ; नीलम गोऱ्हे यांचा टोला

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य, त्यांना पाठबळ देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. राऊतांनी टि्वट करीत हिंदुत्वाच्या (Hindutva)मुद्दावर सध्या आक्रमक झालेल्या विरोधकांना टोला लगावला आहे. 'हिंदुत्व'यावर संजय राऊतांनी चोख शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''हिंदुत्व: काही जणांनी भाड्याने घंटा धारी हिंदुत्व स्वीकारले आहे..वाजवत बसा घंटा!! शिवसेनेचे हिंदुत्व गदा धारी आहे! लक्षात ठेवा!जय महाराष्ट्र!''

"तुम्ही कोणाच्या पाठबळाने मुंबईत येऊन मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक गप्प बसतील का, तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा, तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडू नका, तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा तुम्हालाही घरे आहेत. पण आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com