वरुण सरदेसाई म्हणाले, आमच्यासाठी राणा विषय संपला

Shivsena| Navneet Rana| खासदार नवनीत राणा यांना रविवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
Navneet Rana| Varun Sardesai
Navneet Rana| Varun Sardesai

मुंबई: ''महाराष्ट्रात सोशल मीडिया अधिक मजबूत कारण्यासाठी शिबीर आहे. पण आमच्यासाठी राणा विषय संपला आहे. त्यांनी आम्हाला आव्हान दिले काय झाले हे सगळ्यांनी पाहिले आहे. आता कोण काय म्हणेल याला महत्व देण्याची गरज नाही. 14 तारखेला उद्धव साहेब यावर बोलतीलच, अशा शब्दांत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

उत्तर प्रदेशात शिवसेना (Shivsena) एक्टिव्ह आहे. अयोध्या आणि शिवसेनेचे नाते आहे. उद्धव साहेबांची 14 तारखेची सभा सगळे रेकॉर्ड मोडणारी ठरेल. उद्धव साहेब अयोध्याला गेले त्यावेळी उत्तर प्रदेश मधील हिंदु मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी ही उत्तर प्रदेशातील हिंदू युवक मोठया संख्येने जमा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Navneet Rana| Varun Sardesai
आनंद दिघेंवर बाळासाहेब रागवायचे ; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'ती' आठवण

खासदार नवनीत राणा यांना रविवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना त्यांच्या हातात हनुमान चालीसा दिसली. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, हनुमान चालीसा वाचण्यासाठी मी 14 दिवस काय 14 वर्षे तुरुंगात राहण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी महाराष्ट्रातून कुठूनही निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवा, असे थेट आव्हानही नवनीत राणांनी दिले आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीनिशी जनतेत उभी राहणार आहे. हनुमानाचे आणि रामाचे नाव घेणाऱ्यांना त्रास देण्याचे काय परिणाम होतात, हे येत्या काळात महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंना दाखवून देईल. मी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करेन, पण सरकारकडून माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणार आहे, असा इशाराही नवनीत राणांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com