Vanchit-Thackeray Alliance : 'प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरेंची युती तुटली?' मोठ्या नेत्याचा दावा

आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारकडून विरोधी पक्षनेत्यांवर ज्या कारवाया सुरु आहेत, त्यालाही पाठिंबा दिला आहे.
 Uddhav Thackerey & Prakash Ambedkar
Uddhav Thackerey & Prakash AmbedkarSarkarnama

Vanchit-Thackeray Alliance News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती तुटली आहे. कालच प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाईचं समर्थन केलं. त्यामुळे दोघांची युती तुटल्याचं स्पष्ट आहे, असा दावा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे.

आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारकडून विरोधी पक्षनेत्यांवर ज्या कारवाया सुरु आहेत, त्या योग्य असल्याचं म्हटलं आहे. तसेच ईडी आणि तपास यंत्रणांच्या कारवायांनाही पाठिंबा दिला आहे. प्रकाशजी खरं बोलले. त्यांच्यी फक्ती भाजपसोबत युती होऊ शकते, असा टोलाही कडू यांनी लगावला आहे,

 Uddhav Thackerey & Prakash Ambedkar
Nana Patole News : कॉंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास...; नाना पटोलेंचा इशारा

याचवेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावरही भाष्य केलं आहे. राज्यपाल हा राज्य चालवत नाही. मुख्यमंत्री राज्य चालवतात. पण काही बाबतीत राज्यपालांची आवश्यकता असते. राज्यपालांची उचलबांगडी होणार की नाही, हा विषय महत्त्वाचा नाही. पण राज्यपाल वादग्रस्त विधाने केली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसरात्र काम करत आहेत. मध्यरात्री दोन वाजता गेलं तरी मुख्यमंत्र्यांची भेट होते. मुख्यमंत्री हिराच आहे. हिरा कही भी चमकता है, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुकही केलं. तसेच मंत्रिमंडळ विस्तार लांबण्यावरुनही त्यांनी भाष्य केलं. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार का लांबला यावरही त्यांनी भाष्य केलं.

मंत्रिमंडळातील सर्वांना रात्री चांगली झोप लागते. आणखी चांगली झोप लागावी म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला जात आहे. आताच्या मंत्रिमंडळात वीस लोकांना संधी मिळाली तर इतर जण नाराज होतील. त्यांना झोप लागणार नाही. त्यांना चांगली झोप लागावी म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला जात आहे. तसेच मी नाराज नाही, अशी कबुली देत ते म्हणाले की माझ्या चेहऱ्यावरून कुठेच वाटत नाही मी नाराज आहे. मीच फटाके फोडतो, असंही त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com