Prakash Ambedkar : 'वंचित' भविष्यात भाजपसोबतही आघाडी करू शकते : आंबेडकरांचं सूचक वक्तव्य!

Vanchit-Shivsena Yuti : शिवसेनेने प्रबोधनकारांचे हिंदुत्व स्वीकारल्यानेच युती केल्याचा दावा!
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Vanchit will go with BJP : भाजप (BJP) बदलायला तयार असेल तर भविष्यात आम्ही त्यांचाही विचार करू. यासाठी त्यांनी चार पावले पुढे यावे, आम्हीही चार पावले पुढे जाऊ. बैठकातून निर्णय घेऊ. मी निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मला कोण अडविणार?, असे म्हणत वंचित (Vanchit) बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सूचक पण खळबळजनक वक्तव्य केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर एक प्रयोगशील विचारवंत म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांच्या वक्तव्यांनी राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना आणि वंचित एकत्र येण्यावरून ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचे आहे. वैदिक विचारसरणीने समाजात उतरंड निर्माण केली. ही हुकुमशाहीकडे झुकते. तर संतांनी समाजातील या उतरंडीला विरोध केला. संतानी सहजीवनास प्राधान्य दिले. प्रबोधनकारांचे हिंदुत्व हे संतांच्या विचारसरणीला अनुसरून आहेत. ते आम्हाला मान्य आहे."

Prakash Ambedkar
Raut VS Kesarkar : दीपक केसरकरांनी खुर्चीसाठी नारायण राणेंची लाचारी पत्करली : खासदार राऊतांचा हल्लाबोल

या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी काही स्फोटक विधाने केली आहेत. शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपबरोबर असल्याचा त्यांनी दावा केला. यासाठी त्यांनी अजित पवार यांच्या एका मुलाखतीतील वक्तव्याचा दाखला दिला आहे. त्यावेळी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णयानुसार शपथविधीला गेले होते, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

चोरपावलांनी हुकुमशाहीचे मार्गक्रमण सुरू

'२००४ च्या गुजरात दंगलीची (Gujrat riot) घटना घडली. त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळाली, ती ही नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली मिळवली होती, असे आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, गुजरातमध्ये झालेल्या घटनेचा लोकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसले. नेमके याबाबतच बीबीसीने तयार केलेली डॉक्यूमेंटरीवर आता बंदी घातली जाते. लोकशाहीत या वृत्तीला काय म्हणायचे? ही मोदी यांची हुकुमशाही नाही का?, असे सवालही उपस्थित करीत अशाच चोरपावलांनी हुकुमशाही येत असल्याचे प्रतिपादनही आंबेडकर यांनी यावेळी केले.

Prakash Ambedkar
Kolhapur News : गोकुळ दूधसंघ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय : ठाकरेंना दिलासा तर शिंदे-फडणवीस सरकारला झटका!

'भारत जोडो' अर्थहीन आंदोलन

राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या य़ात्रेची खिल्ली उडविली. आंबेडकर म्हणाले, राहुल गांधी यांची काय भूमिका आहे, तीच समजली नाही. भारत तुटला नसताना ते जोडण्याचा प्रयत्न कसा काय केला जातो? ब्रिटिशांनी सात बेटे जोडून मुंबई निर्माण केली. त्याप्रमाणे भारताचे तुकडे झाले आहेत का? 'भारत जोडो' (Bharat jodo) हे ध्येयहिन, काही विचार नसलेले आंदोलन आहे. त्यानिमित्त राहुल गांधी भारतभर चालले, याचेच कौतूक आहे. यामुळे ते राजकारणाबाबत गंभीर असल्याचे दाखवून तरी दिले, D

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com