Vajramooth Meeting in Mumbai : मुख्यमंत्र्यांच्या होमपीचमधील वज्रमूठ सभेचे बॅनर हटवले ; आव्हाड संतप्त..

Vajramooth Meeting in Mumbai : इतर पक्षांनी लावलेले बॅनर, पोस्टर दिसले नाही का?
Eknath Shinde-Jitendra Awhad
Eknath Shinde-Jitendra AwhadSarkarnama

Vajramooth Meeting in Mumbai on may 1 Jitendra Awad : महाविकास आघाडीच्या राज्यभर महाविकास आघाडीच्या सभा होत आहेत. या वज्रमूठ सभांना जनतेचा जोरदार प्रतिसादही मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील सभांनंतर आता मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची सभा वज्रमूठ सभा १ मे रोजी होणार आहे. तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते यासाठी तयारीला लागले आहेत.

या सभेस विराट संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, अशा आशयाचे फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नुकतेच ठाण्यात लावले होते. परंतु या फलकांवर कारवाई करीत ठाणे महापालिकेने फलक उतरवले आहेत. हे फलक हटवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड संतापले आहे. त्यांनी महापालिका आधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे.

Eknath Shinde-Jitendra Awhad
Mann Ki Baat @100 : 'मन की बात’ ची पिंपरी-चिंचवडमध्ये जय्यत तयारी,ज्येष्ठांसाठी खास सोय

वज्रमूठ सभेचे सर्वाधिक फलक हे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात लावले होते. त्यामुळे शिंदे यांच्या मतदारसंघात फलकबाजी करून ‘राष्ट्रवादी’ने शिवसेनेला (शिंदे गट)आव्हान दिल्याचे दिसून आले होते. मात्र, लावलेले फलक अवघ्या एका दिवसात काढून टाकण्यात आले.

फलकावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करीत शहरात इतर पक्षांनी लावलेले बॅनर, पोस्टर दिसले नाही का? असा सवाल आव्हाडांनी केला आहे. ठाणे शहर परिसरात शुक्रवारी लावलेले हे बॅनर दिवसभरात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खाली उतरवले.

Eknath Shinde-Jitendra Awhad
Kolhapur Bazar Samiti Result : कोल्हापुरातील पहिला निकाल जाहीर ; हमाल गटातील बाबुराव खोत विजयी

"अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे आणि खास करून सत्ताधारी पक्षाचे बॅनर लागलेले आहेत. त्याला साधा हातही लावण्याची हिंमत त्यांनी केलेली नाही. आम्ही काल रात्री बॅनर लावले आणि आज सकाळपासून पालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी ते उतरवायला सुरुवात केली.

त्या अधिकाऱ्यांमध्ये आघाडीचे नाव भालेराव यांचे आहे. मी त्यांना स्वत: फोन केला; पण त्या फोनचे देखील त्यांनी उत्तर दिलेले नाही,’’ असे आव्हाड यांनी सांगितले. या प्रकारानंतर आव्हाड यांनी त्यांचा मोबाईल क्रमांकच सोशल मीडियावर जाहीर केला.

Eknath Shinde-Jitendra Awhad
Nagar Bazar Samiti Result : नगरमध्ये विखे, कर्डिलेंची जादू ; लंकेंचा डंका, तनपुरेंचे वर्चस्व अबाधित, निवडणुकीची ही आहेत वैशिष्ठ्ये..

महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेचा टीझर सोशल मीडियावर जारी केला आहे. या टीझरमध्ये मागील एका वज्रमूठ सभेतील उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणाची झलक पाहायला मिळाली.

मागील एका सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, देश कसा चालला पाहिजे लोकशाही कशी टिकली पाहिजे यासाठी एक माणूस देशासाठी संविधान लिहू शकतो. तर इतकी मोठी वज्रमूठ, कोट्यवधी, अब्जावधी लोक त्या राज्यघटनेचं रक्षण करू शकत नाही का?

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com