CM Yogi Adityanath : जेपी नड्डा यांच्यानंतर योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर; कारण काय? चर्चांना उधाण

CM Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता
UP CM Yogi Adityanath Latest Marathi News
UP CM Yogi Adityanath Latest Marathi NewsSarkarnama

CM Yogi Adityanath : भाजपने देशात 'मिशन १४४'च्या तयारीला महाराष्ट्रातून सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये सभा देखील घेतल्या आहेत.

त्यामुळे भाजपने २०२४ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.असे असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या या मुंबई दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

योगी आदित्यनाथ हे या दौऱ्यादरम्यान उद्योगपती आणि बॉलिवूडमधील दिग्गजांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर ५ जानेवारीला सिद्धिविनायक व महालक्ष्मीचे दर्शन ते घेणार आहेत. यावेळी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

UP CM Yogi Adityanath Latest Marathi News
Sanjay Shirsat : सत्तारांचे मंत्रीपद राहिले काय ? अन् गेले काय ? माझा त्याच्याशी संबंध नाही..

दरम्यान, या आधी २०२० मध्ये योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशमध्ये नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागा देखील राखून ठेवली असल्याचे सांगितले होते.

तसेच ही फिल्म सिटी बॉलिवूडपेक्षा (Bollywood) मोठी असेल, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका देखील झाली होती. मात्र आता ते मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येत असून बॉलिवूडमधील दिग्गजांची भेट घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com