'महाविकास'च्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर : जयंत पाटील

अनिल परब यांच्याविरोधात वेगवेगळ्या पध्दतीने दबाव आणून स्टेटमेंट घेतले जातेय हे चुकीचे काम सुरू आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
'महाविकास'च्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर : जयंत पाटील
Use of ED to get Mahavikas leaders in trouble: Jayant Patil

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतो आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. Use of ED to get Mahavikas leaders in trouble: Jayant Patil

निव्वळ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनाच नव्हे तर देशातील भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्रास देणे व त्यांच्या त्रुटी असतील तर त्या हुडकून काढण्याचा प्रयत्न यंत्रणा करताना दिसत आहेत. ज्यांना नोटीसा आल्या आहेत ते नेते सडेतोड उत्तर देतील पण सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. 

हेही वाचा : शंभुराज देसाई म्हणाले, राष्ट्रवादीकडून विचारणा झाल्यास विचार करु

अनिल देशमुख यांच्याबाबतीत एक नंबर कोण हे वारंवार वाझे व इतरांच्या जबाबात सिद्ध झाले आहे. अनिल देशमुख यांचा या केसमध्ये संबंध नाही, हे पुन्हा उघड झाले आहे. शिवाय अनिल परब यांच्याविरोधात वेगवेगळ्या पध्दतीने दबाव आणून स्टेटमेंट घेतले जातेय हे चुकीचे काम सुरू आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.