Urfi Javed-Chitra Wagh Controversy : उर्फी जावेदने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात या गोष्टीचा केलाय स्पष्ट उल्लेख !

पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर उर्फी काल अंबोली पोलिस ठाण्याच चौकशीसाठी हजर झाली होती.
Urfi Javed-Chitra Wagh Controversy
Urfi Javed-Chitra Wagh Controversy

Urfi Javed-Chitra Wagh Controversy: भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात मुंबई पोलिसांत (Mumbai Police) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस बजावली.

पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर उर्फी काल अंबोली पोलिस ठाण्याच चौकशीसाठी हजर झाली होती. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन आणि अश्लीलतेचा प्रचार करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी आपल्या तक्रारीत केला होता. तोकडे कपडे आणि अंगप्रदर्शनावरुन पोलिसांनी तिला प्रश्न विचारले, असता उर्फीनेही आपला जबाब नोंदवला.

Urfi Javed-Chitra Wagh Controversy
Narayan Rane-Sanjay Raut Controversy: संजय राऊत खासदार झाले, हे तर माझेच पाप; असं का म्हणाले, नारायण राणे

आपल्या जबाबात उर्फी म्हणाली की, “मी एक भारतीय आहे, भारताच्या राज्यघटनेने मला माझ्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी माझ्या कामाच्या अनुषंगाने हे कपडे परिधान करत असते. त्यावरून माझं फोटोशूट होतं, पण कधीकधी कामाच्या गडबडीत मला कपडे बदलायला वेळ मिळत नाही. त्याचवेळी फोटोग्राफर माझे फोटो काढतात आणि ते व्हायरल होतात. आता हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवणार?” असा प्रतिप्रश्न उर्फीने केला आहे.

दरम्यान, उर्फीने तोकडे कपडे घालणे बंद केले नाही तर तिचे थोबाड फोडण्याचे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले होते. त्यानंतर उर्फीनेही चित्रा वाघ यांना हा नंगा नाच चालूच राहणार असल्याचे उत्तर दिले होते. गेल्या काही दिवसांपासून या दोघींमधील या शाब्दिक चकमकी चालूच आहेत. त्यामुळे उर्फीच्या जबाबानंतर पोलिस नेमक काय पाऊल उचलणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in