Urfi Javed Contraversy : चित्रा वाघ यांच्यावर उर्फीचा जोरदार पलटवार : म्हणाली, तुमच्या सारख्या राजकारण्यांनी..

contraversy : बेरोजगारी, प्रलंबित बलात्कारीची प्रकरणे इत्यादी समस्या आहेत त्याचं काय?'
contraversy| Urfi Javed Contraversy
contraversy| Urfi Javed ContraversySarkarnama

Urfi Javed Contrav : आपल्या विचित्र आणि वैविध्यपूर्ण फॅशनच्या अदाकारीने नेहमीत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारी उर्फी जावेदवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना टीका केली होती. वाघ यांनी उर्फीला बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी केली. चित्र विचित्र कपड्यांवरून चित्रा वाघ या उर्फीवर चांगल्याच बरसल्या होत्या. उर्फीनं आता चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

contraversy| Urfi Javed Contraversy
Jyoti Mete-Fadnavis : ज्योती मेटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? फडणवीसांनी दिले हे उत्तर....

उर्फीनं म्हणाली, 'तुमच्यासारख्या राजकीय नेत्यांकडे पाहिलं तर अत्यंत दुख होतं. लोकांच्या नजरेत यावं यासाठी आपण माझ्यावर टीका करत आहात. आपल्यासारख्या राजकारण्यांना बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोषी ठरवणं फार सोयीचं आहे. बेरोजगारी, प्रलंबित बलात्कारीची प्रकरणे, हत्यांची अनेक प्रकरण आहेत, इत्यादी समस्या आहेत त्याचं काय?', असं म्हणत आता उर्फीनं चित्रा वाघा यांनाच उलट प्रश्न केला आहे.

उर्फीनं पुढे म्हटलंय, 'तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. ज्या महिलांना खरंच मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काहीच का करत नाही. महिलांचं शिक्षण, लाखो बलात्कारांच्या केसस याकडे तुम्ही का लक्ष देत नाहीत?'

contraversy| Urfi Javed Contraversy
Pune : माधुरी मिसाळ यांची लक्षवेधी अन् फडणवीसांची मोठी घोषणा; झोपडपट्टी विकासाला मिळणार...

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

"शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उद्दामपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हीला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये, अशा आशयाचे ट्विट वाघ यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com