नाराज मेटेंनी घेतली फडणवीसांची भेट; राज्यसभा निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ निर्णय!

शिवसंग्राम पक्षाला जो शब्द देण्यात आलेला होता, तो भाजपकडून पाळला जात नव्हता. ही नाराजी आमच्या आमदारांनी बोलून दाखवली होती.
नाराज मेटेंनी घेतली फडणवीसांची भेट; राज्यसभा निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ निर्णय!
Vinayak MeteSarkarnama

मुंबई : विधान परिषद उमेदवारीत डावलल्यामुळे नाराज असलेले शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी आज (ता. ९ जून) कोरोनातून बरे झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मेटे यांनी ‘आम्ही शब्द पाळणारे आहोत. मैत्रीखातर आम्ही राज्यसभा निवडणुकीत भाजपसोबत असणार आहोत,’ असे सांगितले. विधान परिषद निवडणुकीबाबत मात्र त्यांनी भाजपला पुन्हा ‘गॅस’वर ठेवले आहे. विधान परिषदेबाबतचा निर्णय आम्ही चर्चेनंतर घेऊ, असे मेटे यांनी स्पष्ट केले. (Upset Vinayak Mete meet Devendra Fadnavis)

फडणवीसांना भेटून आल्यानंतर माध्यमांशी बोलताना मेटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केले. ते म्हणाले की, फडणवीस कोरोना निगेटिव्ह आले, याचा आनंद आहे. ते आता सर्व बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शिवसंग्राम पक्षाला जो शब्द देण्यात आलेला होता, तो भाजपकडून पाळला जात नव्हता. ही नाराजी आमच्या आमदारांनी बोलून दाखवली होती. आमचे आमदार भाजपच्या आमदारांसोबत हॉटेलमध्येही गेले नव्हते. आज पुन्हा आमची त्याबाबत चर्चा झाली. आजच्या बैठकीत आम्ही त्यांना सांगितलं की आपण मित्रपक्ष म्हणून दिलेला शब्द पाळणे गरजेचे आहे.

Vinayak Mete
मुंडे, महाजनांना राजकारणातून संपविण्यासाठी कोणीतरी पडद्यामागून प्रयत्न करतयं !

राज्यसभा निवडणुकीबाबत मेटे म्हणाले की, आम्ही शब्द पाळणारे आहोत, राज्यसभा निवडणुकीत आम्ही शब्द दिल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षासोबत असणार आहोत. आमचे दोन्ही आमदार सोबत राहतील, आज रात्री आमचे दोन्ही आमदार भाजप आमदारांसोबत हॉटेलमध्ये जातील. विधान परिषदेबाबतचा निर्णय मात्र राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर चर्चा करून घेण्यात येईल.

Vinayak Mete
सदाभाऊंनी अर्ज भरला पण भाजपचं तिकीट नाही; चंद्रकांतदादांनीचं दिलं स्पष्टीकरण

आमची नाराजी अजूनही शंभर टक्के दूर झालेली नाही. शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. पण, आम्ही शब्द पाळणारे आणि मैत्रीला जागणारे आहोत. मैत्रीखातर आम्ही राज्यसभा निवडणुकीत भाजपसोबत आहोत. विधान परिषदेला मात्र चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असेही मेटे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in