युपीएससी परिक्षेत सातारचा प्रथमेश पवार देशात तिसरा, तर महाराष्ट्रात पहिला

त्यात यश न मिळाल्यामुळे मी जिद्द सोडली नाही. त्याच दरम्यान युनिक ॲकॅडमीच्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि तेलंगणात पोलिस कमिशनर पदावर कार्यरतअसणारे महेश भागवत यांनी वेळोवेळी दिलेला कानमंत्र हेच माझ्या यशाच गमक असल्याचेही प्रथमेश सांगतात.
In the UPSC exams, Prathamesh Pawar is third in the country and first in Maharashtra
In the UPSC exams, Prathamesh Pawar is third in the country and first in Maharashtra

शिवथर (ता. सातारा) : आरफळ येथील प्रथमेश उमेश पवार-पाटील यांनी गावचे नाव देशाच्या पटलावर उज्वल करून 2019 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षोत (युपीएससी) परीक्षेत Central Armed Force Assistant Commandant पदी भारतात तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.

सातारा खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष, आरफळ ग्रामपंचायतचे पहिले सरपंच (कै.) प्रल्हाद रामचंद्र पवार-पाटील यांचे प्रथमेश हे नातू आहेत. प्रथमेश यांचे शिक्षण निर्मला कॉन्व्हेंट सातारा येथे पहिली ते दहावीपर्यंत झाले. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, सातारा येथे एक्स्टर्नल अकरावी व बारावीचे शिक्षण घेतानाच सातारा येथील चाफेकर क्लासेस येथे दोन वर्ष पूर्णवेळ अभ्यास केला.

त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यात जाऊन वाडिया कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतली. सलग दोन वर्ष पुण्यातील युनिक अॅकॅडमीत पूर्णवेळ अभ्यास करून घवघवीत यश मिळवले. या यशात आई सुरेखा, वडील व चुलत्यांचा मोठा वाटा असल्याचे प्रथमेश सांगतात. 

आपल्या या यशाविषयी सांगताना प्रथमेश म्हणाले, कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असताना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते, अशा परिस्थितीत घरात बीएसस्सी झालेले चुलते, त्यांना आलेले अपंगत्व आणि वडिलांच्या वर पडलेली संपूर्ण घराची जबाबदारी, त्यात आमच्या भावंडांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च आणि दुष्काळ अशा परिस्थितीचे चटके सहन करावे लागत होते.

आजोबांपासून सुरु असलेला पारंपरिक शेती व्यवसाय, त्यात शेतमालाचे पडलेले भाव याचा मेळ घालता-घालता वडील मेटाकुटीला येत होते. अशा कठीण परिस्थितीतही मला यश साध्य करता आले, ही माझ्या कुटुंबीयांची देणं आहे. 2016 रोजी इंजिनिअरींग पास होऊन देखील युपीएससीच्या सिव्हील सर्व्हिसची दोन वर्षे तयारी केली.

मात्र, त्यात यश न मिळाल्यामुळे मी जिद्द सोडली नाही. त्याच दरम्यान युनिक ॲकॅडमीच्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि तेलंगणात पोलिस कमिशनर पदावर कार्यरत असणारे महेश भागवत यांनी वेळोवेळी दिलेला कानमंत्र हेच माझ्या यशाच गमक असल्याचेही प्रथमेश सांगतात.

प्रथमेश यांच्या निवडीबद्दल आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश नारायण पवार-पाटील, आरफळचे सरपंच मेघा माने, उपसरपंच सुनील पवार, माजी उपसरपंच वैभव पवार, अश्विन पवार, उमेश पवार, राजेंद्र पवार यांनीही अभिनंदन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com