असंसदीय शब्दांच्या वादावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांचं स्पष्टीकरण

विरोधकांनी हा 1100 पानांचा शब्दकोश (असंसदीय शब्दांचा) वाचला असता, तर गैरसमज झाला नसता.
Om Birla
Om Birlasarkarnama

नवी दिल्ली :संसदेचे पावसाळी अधिवेशन (monsoon session parliament) येत्या 18 जुलैपासून सुरु होत आहे. खासदारांसाठी असंसदीय शब्दांची (Unparliamentary Words) यादी संसदेच्या सचिवालयाने जाहीर केली आहे. या यादीवरुन वाद निर्माण झाला आहे. (Unparliamentary Words latest news)

विरोधकांनी यावर ताशेरे ओढले आहेत. यावरून मोठा गदारोळ झाला आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

असंसदीय शब्द 2021 या शीर्षकासह सचिवालयाने ही यादी प्रकाशित केली आहे. "यातील काही शब्द असे असतात की ते तोपर्यंत असंसदीय वाटत नाहीत. जोपर्यंत ते संसदेत संबोधीत केलेल्या इतर संबोधनाशी ताडून पाहिले जात नाहीत," असे सचिवालयाने म्हटले आहे.

सचिवालयाकडून असंसदीय ठरवलेले शब्द आणि भावना सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकायच्या की कायम ठेवायचे याचे अंतिम राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेचे अध्यक्ष यांच्याकडे कायम असतील, असे संसदेनं प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत नमूद केलं आहे.

Om Birla
मोदींच्या 'ड्रिम प्रोजेक्ट' ला शिंदे सरकारकडून हिरवा कंदील ; बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा

यानुसार हे शब्द असंसदीय (Unparliamentary Words) असणार आहेत.सत्ताधारी अथवा विरोधकांपैकी एखाद्या सदस्याने हे शब्द वापरले तर ते संसदेच्या पटलावरुन काढून टाकले जाणार आहेत. कोरोना स्प्रेडर (Corona spreader) हुकुमशाह, हुकुमशाही, जयचंद (Jaichand), विनाश पुरुष, जुमलाजीवी (Jumlajeevi) यांसारख्या इतरही काही शब्दांचा वापर संसदेमध्ये करणे असंसदीय ठरणार आहेत.

असंसदीय शब्दांच्या वादावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "विरोधकांनी हा 1100 पानांचा शब्दकोश (असंसदीय शब्दांचा) वाचला असता, तर गैरसमज झाला नसता. हा शब्दकोश 1954, 1986, 1992, 1999, 2004, 2009, 2010 मध्ये प्रसिद्ध झाला आहे,"

Om Birla
मोदी सरकारला या शब्दांचे वावडे ; खासदारांनो, तोंड सांभाळून बोला !

"जे शब्द काढून टाकण्यात आले आहेत ते विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाकडूनही संसदेत वापरले आहेत. केवळ विरोधकांनी वापरलेले शब्द निवडून काढलेले नाहीत. ज्या शब्दांवर पूर्वी आक्षेप होता ते काढून टाकण्यात आले आहेत," असे बिर्ला यांनी स्पष्ट केलं.

ओम बिर्ला म्हणाले, "ही यादी नवीन नाही, तर लोकसभा, राज्यसभा किंवा राज्य विधानसभेत आधीच हटविलेल्या शब्दांचे फक्त संकलन आहे. यामध्ये राष्ट्रकुल देशांच्या संसदेत असंसदीय समजले जाणारे शब्द देखील आहेत. यातील बहुतांश शब्द यूपीए सरकारच्या काळातही असंसदीय मानले जात होते. आता प्रसिद्ध झालेली पुस्तिका ही केवळ शब्दांचा संग्रह आहे, सूचना किंवा आदेश नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in