महाराष्ट्राच्या चोराच्या उलट्या बोंबा! भागवत कराडांनी दिले आकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना इंधनावरील कर कमी करण्याचे आवाहन केले होते.
Dr. Bhagwat Karad Latest Marathi News, Political News in Marathi
Dr. Bhagwat Karad Latest Marathi News, Political News in MarathiSarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना इंधनावरील कर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थकित जीएसटीचा (GST) मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकार राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला. त्यावरून भाजप (BJP) नेत्यांकडून ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जात आहे. (Dr. Bhagwat Karad Latest Marathi News)

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर काही वेळातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. 'सिलेक्टिव्ह मेमरी'वर तसेही औषध नाही, असे म्हणत मोदी सरकारने राज्याला काय दिले हे सांगत जीएसटीच्या पैशाची यादीच फडणवीसांनी ट्वीट केली होती. त्यानंतर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनीही आकडे दाखवत टीका केली आहे.

Dr. Bhagwat Karad Latest Marathi News, Political News in Marathi
नवनीत राणांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियात व्हायरल; सहा जणांवर अदखलपात्र गुन्हा

माध्यमांशी बोलताना कराड म्हणाले, 2017-18 पासून ज्यावेळी जीएसटी लागू झाला 2020-21 पर्यंत कुठलाही जीएसटी शिल्लक राहिलेला नाही. यावर्षी म्हणजे 2021-22 या आर्थिक वर्षात 13 हजार 627 कोटींचा परतावा महाराष्ट्राला द्यायचा आहे. हे पैसे साधारणपणे ऑगस्टमध्ये मिळणार आहे. त्यामुळे ठरलेल्या नियमाप्रमाणे हे पैसे मिळतील. आता महाराष्ट्रात चोराच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत.

आम्ही म्हणतोय, व्हॅट कमी करा. नागरिकांना सवलत द्या. आणि हे म्हणत आहेत, जीएसटी द्या. अर्थमंत्रालयाकडून मी माहिती घेतली आहे. उलट कोळसा आणि रेल्वेची 11 हजार कोटी रुपये महाराष्ट्राकडून येणे आहे. त्याची माहितीही मी मागवली आहे. त्याचे पुरावेही तुम्हाला दाखवू शकतो, असं कराड म्हणाले. त्यामुळे आता भाजपच्या या प्रत्युत्तराला ठाकरे सरकारकडून काय उत्तर दिले जाणार याबाबत उत्सुकता आहे.

Dr. Bhagwat Karad Latest Marathi News, Political News in Marathi
राणा दाम्पत्यावर तब्बल 23 गुन्हे! ठाकरे सरकारने कुंडलीच काढली बाहेर

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी मोदींना करुन दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com