union minister for state ramdas athawale warns bollywood against drugs
union minister for state ramdas athawale warns bollywood against drugs

...तर चित्रपटांचे चित्रीकरणच बंद पाडणार! आठवलेंचा बॉलीवूडला निर्वाणीचा इशारा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्जच्या अँगलचा तपास एनसीबी करीत आहे. या प्रकरणी एनसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना रामदास आठवले आक्रमक झाले आहेत.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची आज चौकशी केली. आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आक्रमक झाले असून, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या बॉलीवूडमधील कलाकारांना निर्मात्यांनी काम देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, अनुराग कश्‍यपला अटक न केल्यास रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात आले आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. 

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. रकुल प्रीत सिंह काल चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली. काल तिची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश हिचीही काल चौकशी झाली आहे. आज पुन्हा तिची चौकशी झाली आहे. दीपिका आणि करिष्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. दीपिकाची आज सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. याचबरोबर सारा आणि श्रद्धा यांचीही सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली.  

या प्रकरणी रामदास आठवले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापिका दिशा सॅलियान हिच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लैंगिक शोषणाचा आरोप असलेले दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांना अटक न केल्यास रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

आठवले म्हणाले की, अमली पदार्थ सेवन प्रकरणात नाव आलेले अभिनेते व अभिनेत्रींना बॉलीवूडमधील निर्मात्यांनी आपल्या एकाही चित्रपटात काम दिले तर रिपब्लिकन कार्यकर्ते संबंधित चित्रपटांची चित्रीकरण बंद पाडतील. युवा वर्ग या अभिनेते-अभिनेत्रींना रोल मॉडेल मानतो पण सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर अमली पदार्थाची जी माहिती समोर येत आहे त्यातून बॉलीवूडची लज्जास्पद बाजूही जगासमोर आली आहे. बॉलीवूडची प्रतिमा जपायची असेल तर संबंधित अभिनेत्रींना निर्मात्यांनी यापुढे एकाही चित्रपटात काम देऊ नये. ज्या चित्रपटांत ते असतील त्यातून त्यांना बाहेर काढावे. असे तातडीने केले नाही तर रिपब्लिकन कार्यकर्ते तो चित्रपट बंद पाडतील. 

अनुराग कश्‍यप यांच्यावर पायल घोष हिने केलेले आरोप गंभीर असल्याने त्याला त्वरित अटक करावी असे सांगतानाच, साऱ्याच अभिनेत्रींना कश्‍यप याच्याकडून असाच अनुभव आला असेल असे नाही, असेही आठवले म्हणाले. 

करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनचा कार्यकारी निर्माता या क्षितिज प्रसाद प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एनसीबीने कालपासून त्याची चौकशी सुरू केली होती. तब्बल 24 तासांच्या चौकशीनंतर त्याला एनसीबीने आज अटक केली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

एनसीबीने या प्रकरणी 24 सप्टेंबरला फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आणि सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी यांची चौकशी केली होती. त्याआधी जया साहा हिची सलग तीन दिवस चौकशी झाली होती. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com