"असं होणार हे मी तर आधीच सांगितलं होतं" : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danave | BJP | Shivsena : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीशी भाजपचा काहीही संबंध नाही.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

मुंबई : हे जे काही सुरु आहे, तो शिवसेनेचा (Shivsena) अंतर्गत प्रश्न आहे. त्याचा भाजपशी (BJP) काहीही संबंध नाही. आम्ही सरकार बनविण्याचा कोणताही दावा करत नाही. आम्ही केवळ वाट बघणार आहोत. आमचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशीही बोलणे झालेले नाही. आम्ही आधीच सांगितले होते की आम्ही सरकार पाडण्याची कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करणार नाही. हे सरकार आपोआपचं पडेल, असे म्हणतं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave Patil) यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ते मुंबईत बोलत होते.

दरम्यान, फडणवीस काल संध्याकाळी उशिरा दिल्लीतून मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देत आहेत. आज दिवसभरामध्ये केंद्रीय मंत्री राबसाहेब दानवे, आमदार गिरीष महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते भेटून गेले आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुचक वक्तव्य करत ''की शिंदेंचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. त्याचबरोबर सरकार स्थापनेसंदर्भात जर शिंदे यांनी प्रस्थाव दिला तर आम्ही विचार करु, असे म्हटले आहे. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. शिवसेनेतून नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन शिवसेनेत उभी फूट पाडली आहे. त्यांच्यासोबत जवळपास ४० आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले असल्याचेही सांगितले जात आहे. एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार सध्या गुवाहटी, आसाममध्ये आहेत. तिथेच त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.

याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरुन राज्यातील जनतेशी आणि बंडखोर आमदारांशी संपर्क साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदेंसमोर गुगली टाकत समोर येवून राजीनाम्याची मागणी करण्याबाबत सांगितले. तसेच माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही, असे म्हणतं भावनिक आवाहनही केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com