आघाडीच्या पाच आमदारांबद्दल आठवलेंचे सूचक वक्तव्य; सेनेचे टेन्शन वाढवले!

राज्यसभेच्या (RajyaSabha) सहाव्या जागेवरुन राज्यात राजकारण रंगले आहे
Ramdas Athavale, Chandrakant Patil
Ramdas Athavale, Chandrakant Patilsarkarnama

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेसाठी (RajyaSabha) रणधुमाळी सुरु असून राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. नेतेमंडळींच्या गाठीभेटी वाढल्या असून घोडेबाजार होऊ नये म्हणून सर्व पक्षांचे प्रयत्न सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेत भाजपच्या (BJP) विजयाचा दावा केला आहे. (Ramdas Athavale Latest News)

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आज मी चर्चा करण्यासाठी आलो असल्याची माहिती रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले, राज्यसभेसाठी धनंजय महाडिक निवडून यावे त्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू आहे. महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या पाच आमदारांना भाजपसोबत यायला काहीच हरकत नाही, असेही त्यांनी सांगितले. भाजपची जागा निवडून येईल यासंदर्भात प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झाली आहे आहे.

Ramdas Athavale, Chandrakant Patil
पालकमंत्री बच्चू कडूंसमोर सेना आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये जुंपली !

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत 'आरपीआय'ला जागा मिळाल्या पाहिजे यावरही चर्चा झाली, असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. धनंजय महाडिक निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे, असेही आठवले म्हणाले. राज्यसभेची निवडणूक भाजप जिंकणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला चांगलाच धडा शिकवणार आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Ramdas Athavale, Chandrakant Patil
मुक्कामाच्या तयारीनेच मुंबईत या : राष्ट्रवादीच्या आमदारांना निरोप!

बहुजन विकास आघाडीची तीन मते आहेत. याशिवाय अपक्षही भाजपसोबत आहेत त्यामुळे आम्हाला याचा फायदा होणार आहे. आमदार बदलले असल्याने शिवसेनेने हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीपूर्वी शिवसेनेची काही मते फुटण्याची शक्यता असल्याचेही आठवले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com