
Nitin Gadkari News : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या परखड विधानाबाबत प्रसिद्ध आहे. त्यांच्या भाषणात ते कधी भाजपलाच घरचा आहेर देतात. मुंबई येथे राज्य सरकारकडून आयोजित केलेल्या विश्व मराठी संमेलनात गडकरींनी भष्ट्राचारांच्या विषयावर लोकप्रतिनिधी, मंत्र्यांना टोला हाणला.प्रशासनात चाललेल्या बाबूशाहीवर त्यांनी भाष्य केलं.
नितीन गडकरी म्हणाले, "महाराष्ट्रात उद्योग वाढवायचे असतील तर कामात पारदर्शकता हवी, पण आपल्याकडे मालपाणी दिल्याशिवाय अधिकारी फाइलच हलवत नाही,"
गडकरींच्या या विधानाने सभागृहात हशा पिकला. यावेळी राज्याचे शालेय मंत्री, व विश्व मराठी संमेलनाचे प्रमुख आयोजक दीपक केसरकर उपस्थित होते.
गडकरींना रोख कुणाकडे होता, याबाबत यावेळी चर्चा सुरु झाली. त्यानंतर गडकरींनी उपस्थित मंत्र्यांकडे पाहून मी महाराष्ट्राबद्दल नाही बोलत तर बाहेरच्या राज्यांसाठी बोलतोय," असे सांगत स्पष्टीकरण दिले.
गडकरी म्हणाले, "ज्यांना एक तारखेला पगार मिळतो, त्यांना वेळेचं महत्व कळत नाही. व्यवस्थेमध्ये परवाने मिळायला खूप वेळ लागतो.इतक्या दिवसांत परवानग्या मिळाल्याच पाहिजेत, नाहीतर प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला पाहिजे, व्यवस्थेतला प्रत्येक माणून त्रास देतो. त्याला कंटाळून लोकं निघून जातात. मंत्री असल्यामुळे लोकं आपल्यासमोर बोलत नाहीत. पण मालपाणी दिल्याशिवाय कुणी फाइलचं हलवंत नाही,"
"मला आतापर्यंत चार डिलीट पदव्या मिळाल्या आहेत. पण ज्यावेळी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो, त्यावेळी अकरावी सायन्समध्ये कमी गुण मिळाल्याने मला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नव्हता. मात्र, आता बांधकाम क्षेत्रातील कामांमुळे अनेक पुरस्कार मिळत आहेत. मला याचं आश्चर्य वाटतं की, इंजिनिअरिंग केले नाही आणि आता पुरस्कार कसा घेऊ? विद्वान असणं आणि हुशार असणं यातला हा फरक आहे," असे गडकरी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.