नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता! नारायण राणेंच्या ट्विटनं खळबळ

एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप घडवला आहे.
Narayan Rane Latest Marathi News, Eknath Shinde Latest Marathi News
Narayan Rane Latest Marathi News, Eknath Shinde Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेत नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांच्या या बंडाच्या पवित्र्याचे स्वागत करत भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खळबळजनक ट्विट केले आहे. लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, असं राणे म्हणाले आहेत. (Narayan Rane Latest Marathi News)

पक्षात डावललं जात असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली होती. काल विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही नाराजी उफाळून आली. एकनाथ शिंदे अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली. सध्या ते गुजरामधील सुरतमध्ये असून त्यांच्यासह 25 हून अधिक आमदार असल्याचे समजते. (Eknath Shinde Latest News Update)

Narayan Rane Latest Marathi News, Eknath Shinde Latest Marathi News
एकनाथ शिंदेंशी संपर्क झाला, चंद्रकांत पाटील यांनीच सगळी व्यवस्था केलीय! संजय राऊतांचं मोठं विधान

शिंदे यांच्या बंडानंतर राणे यांनी सुचक ट्विट केलं आहे. यामध्ये नेते आनंद दिघे यांचा उल्लेख केला आहे. दिघे हे शिवसेनेतील मोठे नेते होते. ठाण्यात त्यांचं प्रस्थ होतं. पण त्यांना शिवसेनेत डावण्यात आल्याचा आरोप त्यावेळीही झाला होता. तसेच त्यांच्या मृत्यूबाबतही अनेकदा संशय व्यक्त करण्यात आला होता.

आता राणे यांनी दिघे यांच्या उल्लेख करून शिंदे यांना शाब्बासकी दिली आहे. 'शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता,' असं ट्विट राणे यांनी केलं आहे. त्यामुळे यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, नॉट रिचेबल मंत्र्यांमध्ये शिंदे यांच्यासह गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, संदीपान भूमरे, अब्दूल सत्तार या नेत्यांचा समावेश आहे. तर जवळपास पंचवीस आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेत पहिल्यांदाच एवढं मोठं बंड होत आहे.

हे आहेत नॉट रिचेबल आमदार

1. एकनाथ शिंदे

2. शंभूराज देसाई

3. अब्दुल सत्तार

4. संजय सिरसाट

5. संदीपान भुमरे

6. शहाजी पाटील

7. तानाजी सावंत

8. प्रकाश आबिटकर

9. ज्ञानराज चौगुले

10. किशोर पाटील

11. प्रताप सरनाईक

12. रमेश बोरणारे

13. उदयसिंह राजपूत

14. प्रदीप जैस्वाल

15. महेश शिंदे

16. शांताराम मोरे

17. विश्वनाथ भोईर

18 संजय गायकवाड

19. भरत गोगावले

20. महेंद्र थोरवे

21. श्रीनिवास वनगा

Narayan Rane Latest Marathi News, Eknath Shinde Latest Marathi News
संजय राठोड नॉटरीचेबल; विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्का

मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरू होते. आमदार संजय राठोड यांनाही पुन्हा मंत्रीमंडळात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना केवळ आश्वासन मिळत आहे. त्यामुळे आमदार राठोड नाराज होते. राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. शिवसेनेचे नेते गायब झाल्याने नवीन राजकीय समीकरण जुळून येण्याची चिन्हे आहेत. या धक्कातंत्राने भारतीय जनता पक्ष आपल्या सत्ता स्थापन करण्याच्या हेतूत यशस्वी होऊ शकते, अशीही चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com