Disha Salian Case:राणे पिता-पुत्राला १० मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश

नितेश राणेंना ३ मार्चला, तर नारायण राणेंना ४ मार्चला हजर राहण्यासाठीची नोटीस पाठवण्यात आली होती.
nitesh rane, narayan rane
nitesh rane, narayan rane

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. याप्रकरणी राणे व त्यांचे पुत्र नितेश राणे (nitesh rane) यांच्यावर मालवणी (malvani police station)पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणे पिता-पुत्रांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. नितेश राणेंना ३ मार्चला, तर नारायण राणेंना ४ मार्चला हजर राहण्यासाठीची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, दिलेल्या तारखेला नारायण राणे आणि नितेश राणे चौकशी हजर राहिले नाहीत. पण उद्या (शनिवारी) नारायण राणे आणि नितेश राणे मालवणी पोलिसांसमोर हजर राहणार आहेत. दिंडोशी कोर्टाने नारायण राणे आणि नितेश राणेंना दिलासा देऊन १० मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर दिशा सालीयनचा  मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आलं आणि राणेंनी थेट राज्यातील एका युवा मंत्र्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या तक्रारीवरून हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे .

nitesh rane, narayan rane
भाजपचा आणखी एक नगरसेवक राजीनामा देणार ; १५ दिवसांत चौथा धक्का

''दिशा सालियनवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्या वेळी एका मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. मालवणी पोलीस ठाण्यातून महिला आयोगाने दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल मागवला होता. त्या अहवालात दिशा सालियनच्या शवविच्छेदनाचा अहवालाचा समावेश आहे. दिशा सालियनवर बलात्कार झाल्याचा शवविच्छेद अहवालामध्ये उल्लेख नाही. यानंतर नारायण राणे यांच्यावर महिला आयोगाने खोटे आरोप केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com