पुण्यातील वाद थंडावल्यानंतर राणेंना चार दिवसांनी आठवला अन् केलं ट्विट

पुण्यात चार दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
Union Minister Narayan Rane Latest Marathi News
Union Minister Narayan Rane Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : मागील अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही महत्वाच्या राजकीय घडामोडींवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून तातडीने प्रतिक्रिया दिली जाते. ही घटना ठाकरे सरकार, महाविकास आघाडी किंवा भाजप नेत्यांबाबत असेल तर त्यांच्याकडून अधिक आक्रमकपणे बोलतात. पण पुण्यात चार दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दौऱ्यावेळी झालेल्या वादावर राणेंनी चार दिवसांनी ट्विट केलं आहे. (Union Minister Narayan Rane Latest Marathi News)

स्मृती इराणी (Smriti Irani) या 16 मे रोजी पुण्यात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन केले होते. तसेच बालगंधर्व कलादालनात कार्यक्रमादरम्यानही राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण झाली. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. (Narayan Rane criticizes Mahavikas Aghadi)

Union Minister Narayan Rane Latest Marathi News
वि’स्मृती’चा इलाज लवकर शोधा! राष्ट्रवादीची स्मृती इराणींसाठी नवी A, B, C, D...

या घटनेनंतर भाजपने राष्ट्रवादीवर टीका करत इराणींवर हल्ल्याचा कट होता, असा आरोप केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांवर या घटनेचा विविध माध्यमातून निषेध केला. या घटनेमुळे भाजप व राष्ट्रवादीचे नेते आमनेसामने आले होते. त्यानंतर हा वाद आता काहीसा थंडावला असताना राणे यांनी चार दिवसांनी शुक्रवारी घटनेचा निषेध करणारं ट्विट केलं आहे.

राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर १६ मे रोजी पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. स्मृती इराणी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे येथे गेल्या असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सगळ्याच क्षेत्रांत अपयश आल्याने तसेच सरकार जनतेच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने जनतेची सरकारवर असलेली नाराजी स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना आलेल्या नैराश्यातून हा हल्ला झाला, हे उघड आहे, अशी टीकाही राणेंनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com