जनआशीर्वाद यात्रा गोळीबार : केंद्रीय मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी

भाजपच्या कार्यकर्त्यांकडे विनापरवाना शस्त्रास्त्र होते, याचा अर्थ भाजपचे लोक लोकांना घाबरवण्यासाठी याचा वापर करत आहेत. त्यामुळे मोदी सरकारकडे थोडी जरी नैतिकता असेल तर अशा केंद्रीयमंत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशीही मागणी महेश तपासे यांनी केली आहे.
जनआशीर्वाद यात्रा गोळीबार : केंद्रीय मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी
karnatak yatra

मुंबई : कर्नाटकमधील बिदर येथील भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत भाजप समर्थकांनी केंद्रीयमंत्री भगवंत खुबा यांच्यासमोरच हवेत गोळीबार करून भाजपने लोकशाही गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भविष्यात भाजपची पाऊले कुठल्या दिशेने जात आहेत हे लक्षात येतेय, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. दरम्यान, भाजपने नैतिकता म्हणून भगवंत खुबा यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.  Union Minister Bhagwant Khuba should be expelled from the cabinet ...

कर्नाटकमधील बिदर येथे भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत भाजप समर्थकांनी हवेत गोळीबार करत केंद्रीयमंत्री भगवंत खुबा यांचे जोरदार स्वागत केले. मात्र यामुळे सर्व सामान्य जनतेत दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले, असेही महेश तपासे म्हणाले. 

भाजपच्या कार्यकर्त्यांकडे विनापरवाना शस्त्रास्त्र होते, याचा अर्थ भाजपचे लोक लोकांना घाबरवण्यासाठी याचा वापर करत आहेत. त्यामुळे मोदी सरकारकडे थोडी जरी नैतिकता असेल तर अशा केंद्रीयमंत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशीही मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

काय घडले होते नक्की?

कर्नाटकमधील बीदर येथील भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत भाजप समर्थकांनी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्यासमोरच हवेत गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. बीदरमधील या जनआशिर्वाद यात्रेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात माजी मंत्री बाबारव चिंचनसूर हे देखील बंदुकीसोबत पोझ देताना दिसताहेत. तसेच भाजप कार्यकर्ते बंदुकी नाचवत असून हवेत गोळीबार करतात.दरम्यान, मंगळवारी काढण्यात आलेल्या या जनआशिर्वाद यात्रेत गोळीबार झाल्याचे पोलिसांनी म्हटले असून या प्रकरणी शणप्पा, मोनप्पा, निंगप्पा आणि देवेंद्र या चौघांना अटक करण्यात आली आहे. तसेच बंदुकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या बंदुकीपैकी दोन बंदुकींचे लायसेन्स असून अन्य दोन बंदुकींबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in