कल्याणवर दावा? श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातच भाजपचे मिशन 2024

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) कंबर कसली आहे
BJP Politics
BJP Politics

कल्याण : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) कंबर कसली आहे. राज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने लोकसभा मतदारसंघासह इतर 16 मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या 16 मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदारसंघाचेही नाव आहे. या मतदारसंघाचा केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत.

भाजपचे संघटनात्मक बांधणी आणि शत प्रतीशत भाजपसाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. कल्याणचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आहेत. भाजपने राज्यातील 16 मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये कल्याणची निवड केल्याने या मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. भाजपच्या या मिशनचे एखनाथ शिंदे आणि पितापुत्र समर्थन करणार का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

BJP Politics
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे? ऑडिओ क्लिप व्हायरल

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जे शिवसेनेकडे होते अशा महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. अशा लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहे. यात कल्याण लोकसभा मतदार संघाचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे. प्रामुख्याने डोंबिवली शहरात भाजपच्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भाजपचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी संजय केळकर यांनी अनुराग ठाकूर तीन दिवस दौरा करणार असल्याची माहिती दिली आहे.

अनुराग ठाकूर तीन दिवसात हा मतदार संघ पिंजून काढणार आहेत. या दौऱ्यात तळागाळातील कार्यकर्त्यांपासून जुन्या पदाधिकाऱ्यापर्यंत आणि योजनेच्या लाभार्थ्यापासून नव्या मतदारांपर्यंत सर्वाशी चर्चा करत आहेत. शत प्रतिशत भाजप या उद्देशानेच हा दौरा असून वरिष्ठ स्तरावर या दौऱ्याचे नियोजन 6 महिन्यापूर्वीच करण्यात आले, असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या नियोजनानुसारच हा दौरा होणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.

BJP Politics
Shivsena : ठाकरेंवर टीका करणाऱ्या शहा, राणा, गुलाबरावांवर खैरे बरसले..

दरम्यान, कल्याण लोकसभा मतदार संघ हा डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला मानला जातो. सलग दोन वेळा या मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून ते निवडून आले आहेत. डॉ. शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबध निर्माण केले आहे. मात्र, श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात भाजपने लक्ष केंद्रित केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com