श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील विकासाची केंद्रीय मंत्री ठाकूरांनी केली पोलखोल

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवसीय कल्याण-डोंबिवलीच्या (Kalyan Dombivli) दौऱ्यावर आहेत
Anurag Thakur
Anurag Thakursarkarnama

Anurag Thakur : कल्याण : कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हैराण झालो आहे. आतापर्यंत ज्या शहराला स्मार्ट सिटी घोषित केले, तिथे बदल व काम झालेले पाहिले आहे. कल्याण-डोंबिवली हे शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केल्याचे मला वाटलेच नाही, असे खडेबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना सुनावले. या मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) आहेत.

ठाकूर नुकतेच कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांनी महानगपालिका मुख्यालयात आयुक्त भाऊसाहेब दांगडे, इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान ठाकूर स्मार्ट सिटीच्या कार्यालयालाही भेट दिली. यावेळी त्यांना स्मार्ट सिटी संदर्भातील व्हिडीओ दाखवण्यात आले.

Anurag Thakur
अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीतच झापले; ‘तो निर्णय तुम्ही जाहीरच कसा केला?’

हे व्हिडीओ पाहताच ठाकूर म्हणाले, ही स्मार्ट सिटी आहे हे ऐकून मीच हडबडलो. ज्या शहरात स्मार्ट सिटीची घोषणा केली आहे. तेथे रस्ते, स्वच्छता, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवल्याने ते शहर सुंदर झाले आहे. मात्र, कल्याण-डोंबिवली शहरात बदल मला कुठेच दिसला नाही. ठाकूर यांनी सर्वांसमोच आयुक्तांना सुनावल्यांने सर्वांच्याच चेहऱ्यावरील रंग उडाला होता.

Anurag Thakur
ठाणे तालुक्यातील 'या' १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली शहर सर्वात घाणेरडे शहर आहे, असे म्हटले होते. त्यानंतर ठाकूर यांच्या रुपाने आणखी एका केंद्रीय मंत्र्यांनी शहराच्या विकासाबद्दल चिंता व्यक्त केली. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनीही ट्वीटवरवरुन महापालिकेवर टीका केली होती. डोंबिवली महापालिका ही फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो, बरे झाले आपणच घरचा आहेर दिला, असे ते म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in