अमित शहा मुंबईतही हैदराबादची पुनरावृत्ती करणार? आक्रमक भाषणाचा कार्यकर्त्यांना बूस्टर!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) दौन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत
Amit Shah
Amit Shahsarkarnama

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या दौऱ्याच्या निमित्तान भाजपने (BJP) मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे. तसेच अमित शहा यांचे शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जागा दाखवण्याचे पदाधिकाऱ्यांना आव्हान आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आक्रमक भाषण यामुळे भाजप या निवडणुकीत आपले सर्वस्व पणाला लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

शहा हे भाजपचे चाणक्य आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीचे मैदान भाजपच्या दृष्टीने अनुकूल बनवण्यासाठीच त्यांचा हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. अमित शहा यांनी हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीही मोठ्या प्रमाणात दौरे केले होते. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. यासाठी शहांनी हैदराबादला खास दौरा करून रोड शो केला होता. शहा यांच्या या दौऱ्यांची परिणीती निवडणुकीत बघायला मिळाली. भाजपने या निवडणुकीत पहिल्यांदाच दणदणीत विजय संपादन केला होता.

Amit Shah
Shivsena : मुंबई महापालिकेत १५१ जागा येतील, उद्धव ठाकरेंनी सायलेंट प्लानिंग केलयं..

हैदराबाद महानगरपालिकेत भाजपने 4 वरून थेट 48 नगरसेवकांपर्यंत मजल मारली. यामुळे हैदराबाद महापालिकेत तेव्हापर्यंत खिजगणतीत नसलेला भाजप थेट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. हैदराबादमधील भाजपच्या सरशीचा फटका तेलंगाणा राष्ट्रीय समितीला बसला. टीआरएसच्या नगरसेवकांची संख्या 99 वरून 56 वर आली. त्यांचे 43 नगरसेवक कमी झाले. एमआयएमला 44 जागा कायम ठेवण्यात यशस्वी ठरली होती. भाजपने 4 नगरसेवकांवरून 48 नगरसेवकांवर मजल मारली होती.

227 जागा असलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. महापालिकेत शिवसेनेचे 84, भाजपचे 82 तर काँग्रेसचे 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 तर एमआयएमचे 2 नगरसेवक आहे. २०१२ च्या निवडणुकीत भाजपचे केवळ 31 नगरसेवक होते. मात्र, 2017 मध्ये भाजपने 51 जास्तीच्या जागा मिळवत 82 पर्यंत मजल मारली होती.

Amit Shah
Ambadas Danve : अमित शाहांना मुंबईत यावे लागले हा तर शिवसेनेचा नैतिक विजय !

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप चे आव्हान आहेच मात्र, त्यातच शिंदे गटही पुढे असणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २५ वर्षाची सत्ता राखण्याचे आव्हान सेनेपुढे असणार आहे. तर भाजपने मुंबई महापालिका ताब्यात घेऊन शिवसेनेला विषेश उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची जोरदार तयारी केली आहे. मात्र, ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com