Amit Shah News : अमित शाह यांनी ते पोस्टर पाहिले अन् राज्यातील सत्तांतराची वात पेटली?

Amit Shah News : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी अनेक दिवस पडद्यामागे अनेक घडामोडी सुरु होत्या!
Amit Shah News
Amit Shah NewsSarkarnama

Amit Shah News : महाराष्ट्रामध्ये मोठे सत्तानाट्य घडले. या सत्तानाट्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. या सत्तांतरात दिल्लीची भूमिका महत्त्वाची होती. तसेच महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी अनेक दिवस पडद्यामागे अनेक घडामोडी सुरु होत्या. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत:च सांगितले होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ते रात्री भेटत होते.

त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबईमध्ये आलेले असताना एक पोस्टर पाहिले आणि त्यानंतर या सत्तांतराची खरी वात पेटली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अमित शाह यांनी पाहिलेल्या त्या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो होते. त्यावरुन शाह मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना म्हणाले होते, 'अपने को इसके बारे मे सोचना है...'

Amit Shah News
Laxman Jagtap News : आता लक्ष्मण दिसणार नाही, याचे दुख राहील, खंबीर अजितदादाही गहिवरले

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार धक्का दिला होता. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलीली आघाडी भाजपला खटकणारी होती. त्यामुळे भाजपनेही ठाकरे यांना धक्का देण्याचा चंग बांधला होता. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळाला लावत राज्यात सत्तांतरण घडवले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात स्वामी नारायण पंथांचा एक कार्यक्रम मुंबईत होता. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. त्यावेळी त्यांना घेण्यासाठी शेलार विमानतळावर गेले होते. 'तिथून ते कार्यक्रम स्थळाच्या दिशेने जात असताना एक होर्डिंग शाहंच्या नजरेला पडले. त्या होर्डिंगवर बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांचे फोटो होते. ते होर्डिंग पाहून शाह म्हणाले 'ये कैसा लगता है..,अचंबा है अपने से बडा स्टेट छीन लिया'

Amit Shah News
Narayan Rane News : राणेंना अडचणीत आणणारा 'तो' पीए कोण? 'मोदीही म्हणाले होते त्यांना आधी हाकला...'

त्यानंतर ते म्हणाले, 'अपने को इसके बारे मे सोचना है...' त्यावर शेलार म्हणाले 'अमितभाई कुछ करना पडेगा'. त्यावेळी शाहांनी थेट उत्तर दिले. 'भावनामे जो दी जाती है वह प्रतिक्रिया होती है, ठंडे दिमाग से किया जाता है वह पूर्ण काम होता है. अपने को रुकना है...' शाह यांनी हे पोस्टर पाहिल्याच्या अडीच वर्षानंतर राज्यात सत्तांतर घडले. या संदर्भातील वृत्त एक मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in