Ramdas Athawale : शरद पवारांबाबतचा रामदास कदमांचा दावा आठवलेंनी खोडून काढला!

शरद पवार यांच्यामुळे शिवसेना फुटल्याचा दावा रामदास कदम यांनी केला होता.
Ramdas Kadam Latest News, Ramdas Athawle Latest Marathi News
Ramdas Kadam Latest News, Ramdas Athawle Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे शिवसेना (Shiv Sena) संपत चालल्याचा, पक्षात फुट पडल्याचा दावा ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नुकताच केला होता. पवारांनी पध्दतशीरपणे शिवसेना कमजोर केल्याचा आरोपही कदम यांनी केला होता. पण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कदमांचा हा दावा खोडून काढला आहे. (Union Minister Ramdas Athawale News)

आठवले यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार नव्हे तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळे शिवसेनेत फुट पडल्याचा दावा केला आहे. राऊतांमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास तयार झाल्याचे आठवले यांनी म्हटलं आहे. राऊतांमुळेच शिवसेना फुटली, असंही आठवलेंनी स्पष्ट केलं.

Ramdas Kadam Latest News, Ramdas Athawle Latest Marathi News
NCP : मोठी बातमी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील विभाग, सेल बरखास्त

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले नसते तर महाविकास आघाडी स्थापनच झाली नसती. राज्यात त्याचवेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले असते, असंही आठवले यांनी म्हटलं आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

कदम म्हणाले होते की, शिवसेनाप्रमुखांचा मुलगा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला आम्हाला आवडले नाही. एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले नसते तर पक्षाचे दहा आमदारही निवडून आले नसते, असा दावा कदम यांनी केला होता.

Ramdas Kadam Latest News, Ramdas Athawle Latest Marathi News
OBC Reservation : महेश झगडे आयोगात नसते तर बांठिया यांनी ओबीसींची कत्तल केली असती!

मी पक्षात 52 वर्ष काम करत असताना शेवटी माझी हकालपट्टी करण्यात आली. एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांचे मी आभार मानतो, असंही कदम म्हणाले होते. कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर शिंदे गटाने नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करत त्यांना पुन्हा नेतेपदी बसवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com