माजी नगरसेवकांची ४ दिवसांपूर्वी बैठकीसाठी 'मातोश्रीवर' हजेरी; अन् आज शिंदे गटात प्रवेश

Shivsena | Uddhav Thackeray | Eknath Shinde : ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला हादरे
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

मुंबई : शिवसेनेतील बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री (CM एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला मिळणारा पाठिंबा वाढत असून ठाणे, कल्याण-डोंबिवली पाठोपाठ मुंबई आणि उल्हासनगरमध्येही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला हादरे बसू लागले आहेत. काल (बुधवारी) मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यानंतर मुंबईतील आणखी काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. (Ulhasnagar shivsena Corporator Support to Eknath shinde group)

अशातच आज माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरमधील १५ पेक्षा जास्त माजी नगरसेवक आज आपल्यासोबत आले असल्याची माहिती दिली. शिवाय नाशिक, दिंडोरी आणि अहमदनगरचे देखील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या गटात सामील झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे २५ नगरसेवक होते. मात्र महापालिकेची मुदत संपली असल्याने सर्वजण सध्या माजी नगरसेवक झाले आहेत.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shivsena : खैरे गुरुंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर ; ठाकरे, राऊत, देसाईंनाही दिल्या शुभेच्छा..

शिंदे समर्थक माजी नगरसेवक अरुण अशान यांच्या नेतृत्वात या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन दिले. मात्र या घटनेतील विशेष गोष्ट म्हणजे यातील बहुतांश माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ४ दिवसांपूर्वीच मातोश्रीवरील बैठकीमध्ये उपस्थिती लावली होती. गत शनिवारी बहुतांश शिवसैनिक, पदाधिकरी आणि माजी नगरसेवकांनी मातोश्री गाठून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले होते.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shivsena: शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार ; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप

राजकारण करायचे नाही :

शिवसेनेचे ४० आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक ठाकरे यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे आगामी काळातही शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर राज्यातील चित्र वेगळे असेल असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा नेहमीच आदर केला आहे, पण राज्यातील ५० आमदार आमच्या भूमिकेसोबत आहेत, राज्यातील अनेक पदाधिकारी सोबत येत आहेत. राजकारण करायचे नाही. राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचं लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in