Magavikas Aghadi Morcha: मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेही मोर्चात सहभागी

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला लवकरच महिला मुख्यमंत्री मिळेल असे वक्तव्य केले होते.
Rashmi Thackeray In Mahamorcha
Rashmi Thackeray In Mahamorcha

Mahavikas Aaghadi Morcha : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. याच्या निषेधार्ष आज महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सह राज्यभरातील सर्वसामान्य जनता आणि अनेक लहान -मोठ्या पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

महाविकास आघाडीच्या मोर्चात उद्धवठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीदेखील हजेरी लावरी आहे.. आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमात उपस्थित न राहिलेल्या रश्मी ठाकरे या अचानक मोर्चात सामील झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ऱश्मी ठाकरे पहिल्यांदा अशा प्रकारे एका जाहीर मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काळात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला लवकरच महिला मुख्यमंत्री मिळेल असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे यांचे मोर्चात सहभागी होणे, हे महत्त्वाचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com