Election Commission : निवडणूक आयोगात शिंदेंनी टाकला डाव; ठाकरेंना धनुष्यबाण गमवावे लागणार?

Election Commission News : निवडणूक आयोगात शिंदे गटाच्या वतीने विविध दावे करण्यात आले आहेत.
Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Uddhav Thackeray| Eknath Shinde|sarkarnama

Election Commission News : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगात (Election Commission) आज (ता. 10) सुनावणी झाली. दोन्ही गटाकडून लाखो प्रतिज्ञापत्र आणि पुरावे निवडणूक आयोगात सादर करण्यात आली आहेत. धनुष्यबाण आणि पक्षचिन्हावर यावेळी सुनावणी झाली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने निवडणूक आयोगासमोर एक अनपेक्षितपणे मुद्दा मांडत ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आयोगात तब्बल 2 तास सुनावणी झाली. ज्यामध्ये ठाकरे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी एक मुद्दा मांडला. हा मुद्दा आज पहिल्यांदाच चर्चेत आला. याबाबतीच पुढील सुनावणी आता 17 जानेवारीला होणार आहे.

Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Election Commission : शिंदे गटाची कादपत्रे बोगस ठाकरेंचा युक्तीवाद; तर ठाकरेंचे प्रमुखपदच बेकायदेशीर शिंदेंचा दावा

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेत बेकायदेशीर बदल करण्यात आल्याचा दावा केला. सुनावणी दरम्यान याच मुद्यावर त्यांनी अधिक भर दिला. '1998 पर्यंत शिवसेनेची घटना अस्तित्वात नव्हती. मात्र, निवडणूक आयोगाने याबाबत शिवसेनेला आदेश दिल्यानंतर घटना तयार करण्यात आली. या घटनेमध्ये पक्षांतर्गत निवडणूक, कार्यकारणी, पक्षाचे प्रमुख पद या गोष्टींसाठी नियम बनविण्यात आले. या घटनेमध्ये शिवसेनाप्रमुखाला नियुक्ती आणि पद काढण्याचे अधिकार दिलेले होते.'

'मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या यांच्यानंतर 2018 साली उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पक्षात कोणत्याही निवडणुका न घेता थेट पक्षप्रमुख पद आणि शिवसेनाप्रमुख या पदाचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले, असा दावा शिंदे गटाने केला. उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पदासाठी कार्यकारिणीच्या मंजुरीची आवश्यकता होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. आपल्या काही जवळच्या लोकांना हाताशी घेऊन गुप्तपणे स्वत:ला पक्षप्रमुख म्हणून घोषीत केले. त्यामुळे हे पदच आणि त्यानंतर शिवसेनेत केलेल्या नेमणुका बेकायदेशीर आहे.' असा दावा जेठमलानी यांनी केल्यामुळे या सुनावणीला वेगळेच वळण मिळाले आहे.

Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Election Commission News: केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे गटाची १२ वकिलांची फौज; पण सिब्बलांची महत्त्वाची मागणी

दरम्यान, ठाकरे गटाने नेते खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी या सगळ्यावर असा दावा केला आहे की, शिंदे गटाने केलेल्या आरोपात तथ्य नाही. शिंदे गट निवडणूक आयोगासमोर फक्त विधानसभा आणि लोकसभेतील बहुमतावर भर देत आहेत. पण पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ठाकरे गटाकडे राष्ट्रीय कार्यकारणीतील प्रतिनिधींची 107 प्रमाणपत्रे, संघटनात्मक प्रतिनिधींची 2 लाख 82 हजार प्राथमिक सदस्यांची 19 लाख नोंदणी व प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात दाखल केली आहेत. त्यातील प्रत्येक व्यक्तीला आम्ही आयोगासमोर हजर करु शकतो, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com