राज्यपालांना वृद्धाश्रमात पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद आंदोलन : ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray News : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील सांगली जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackeray News : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील सांगली जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला आहे. त्यावरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यावरुन आता शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

संध्याकाळी मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारले आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहेत. महाराष्ट्रात खोके सरकार किंवा मिंधे सरकार आल्यापासून राज्याची सातत्याने अवहेलना होत आहे. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारले, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray
Rahul Gandhi : राहुल गांधी प्रतापगड किल्ल्यास भेट देणार

जणूकाही महाराष्ट्रात माणसे राहातच नाही. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाही. कुणीही यावे आणि टपलीत मारावी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावे, हे आता खूप झाले, असा इशारा त्यांनी दिली. महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळे सांगायची गरजच नाही.

त्यांचा अपमान झाल्यानंतरही गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहे. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, असेही ठाकरे म्हणाले. तसेच ठाकरे यांनी यावेळी देशाचे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या विधानावर त्यांनी आक्षेप घेतला. देशाचे कायदाम मंत्री म्हणातात न्यायाधिशांची नियुक्ती पंतप्रधानांनी करावी, यावरुन त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray
आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले; अजित पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले...

तसेच सर्वोच्च न्यायालयाने मुख्म निवडणूक आयुक्तांच्या बाबत केलेल्या टिप्पनीचा उल्लेख करत, केंद्र सरकारला सुनावले. निवडणूक आयुक्त हे वेळ पडली तर पंतप्रधानांवरही कारवाई करणारे असावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यावर ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका योग्य आहे. टी. एन, शेशन यांच्यासारखे निवडणूक आयुक्त हवे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com