ते म्हणातात बाप चोरणारी टोळी मात्र आम्हाला त्याचा अभिमान...

मुख्यमंत्री शिंदे दिल्लीतून लाईव्ह...
Cm Eknath shinde
Cm Eknath shindeSarkarnama

बाळासाहेबांनी मोठी मेहनत केली आहे. आता त्यांच नावं हिंदूह्दय सम्राट म्हणायला सुद्दा ते कचरत आहे. इतके ते सत्तेत मग्न झाले आहे.

मी जनतेत जाणारा असल्याने या धास्तीने सर्व घराबाहेर पडत आहेत. आता त्यांचं पुण्य मला मिळत आहे. 

मोदींजींनी ३७० कलम हटवली, राम मंदिरही जोरात सुरू झाली आहे. यामुळे मोदींचा हस्तक असल्याचा मला अभिमान आहे.

आम्ही टीका करणार नाही आम्हाला विकास करायचा आहे. मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हणत आहे. मी म्हणालो मला त्याचा अभिमान आहे. मी विकासाच कत्राट घेतलं आहे. याचा मला अभिमान आहे. मी मोदींचा हस्तक आहे. मात्र दाऊत सोबत ज्यांचे संबध त्यांच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत होत नाही. 

आम्हाला आभिमान आहे की ते म्हणातात बाप चोरणारी टोळी म्हणतात.मग आम्ही बापांचा विचार विकणारे म्हणायचं का?

आता आम्ही ठोकळा खातोय म्हणतात, मात्र आम्ही ठेचा खावूनच त्यांना ठेचले आहे.

ते आम्हाला मिंदे गट म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे खंद्दे आहोत. आम्ही तुम्हाला तिन महिन्या आधीच आसमान दाखवलं आहे.

राज्यातील कुठल्याही भागात जातोय लोक हजारोंच्या संख्येंने स्वागत करत आहेत. लोकांना आमचा निर्णय आवडत आहे. त्यामुळे त्यांनी मी त्यांचा माणूस वाटत आहे.

मोदी आणि शहा यांनी मला मुख्यमंत्री बनवलं आहे. आमचा यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. आम्ही शिवसेना वाटवण्यासाठी हा उठावं केला. 

ते आम्हाला खोके सरकार म्हणत आहेत. मात्र त्यांचा हिशोब माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहित आहेत. वेळ आल्यावर सर्व सांगेल, असा इशाराही त्यांनी ठाकरेंना दिला आहे.

कुणालाही आतापर्यंत रोजगार मिळाला नाही. राज्यातील शिवसैनिकांच्या अडचणी मी सोडवल्या.  

गद्दार कोण ही विचार करण्याची वेळ आहे. गद्दार कोण आणि खुद्दार कोण ये पब्लिक सब जानती है!

आपण जर शिवसैनिकांना नोकर म्हणत असाल तर कोण तुमच्या सोबत राहील. गेली अडीच वर्षात त्यांना गटप्रमुख दिसत नव्हते. मात्र आज त्यांना आम्ही उठाव केल्याने ते आठवत आहे. चांगली गोष्ट आहे. 

शिवसेना ही प्रायव्हेट कंपनी नसून रक्ताच पाणी करून उभी केलेली बाळासाहेबांची शिवसेना आहे. आम्हाला यामुळे गावागावातून समर्थन मिळत आहे. आता झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना लोकांनी नाकारले आहे. 

आमच्या या  निर्णयास सर्व आमदार आणि खासदारांनी साथ दिली आहे. आणि इतर राज्यातील प्रमुखांसाठी देखील आम्ही काम करणार आहे. ज्यांनी आम्हाला समर्थन दिलं त्यांच्यासोबत धोका केला जाणार नाही.

आम्ही जर चुकीचं केलं असतं तर लाखोंच्या संख्येंने लोक जमतात आणि आम्ही घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करतात. राज्याबाहेर देखील आमच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत. तुम्ही उठाव केल्याने तुम्ही वनवास बंद केला आहे.

सत्तेत  असूनही आमच्या आमदारांवर अन्याय होत होता. त्यावेळी मी त्यांना मदत केली. त्यांचं तेव्हा कोणी एकत नव्हत. ज्यावेळी सहन करणं असह्य झालं यामुळे आम्ही नंतर हा उठाव केला. 

बाळासाहेब कॅाग्रेस आणि राष्ट्रवादीला शत्रू मानत होते. मात्र, त्यांच्या विचाराशी प्रतारणा केली गेली. आणि फक्त मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याशी युती केली गेली. 

आम्हाला सत्तेची लालसा नव्हती, आम्ही मोदी आणि बाळासाहेबांचा फोटो लावून निवडणुक लढवली होती. मात्र विरोधकांसोबत सत्ता स्थापनं केली. तेव्हा विश्वास होत नव्हता. या विरोधात आम्ही उठाव केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र सदनातून लाईव्ह...भाषणाला सुरूवात ...राज्य प्रमुखांची भेट घेण्यासाठी आम्ही दिल्लीत आलो आहेत.

जे विकले गेले त्यांना थांबवण्यात काही अर्थ नव्हता. मी देखील त्यांना डांबून ठेवू शकलो असतो. मात्र, जे विकले गेले त्यांना थांबवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे त्यांना गेट आऊट, अशा शब्दात ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला... 

माझ अमित शहांनी आव्हान आहे की, महिन्याभरात मुंबई पालिका  निवडणुका घ्या... आणि हिंमत असेत तर विधानसभेचीही, अशी थेट आव्हान त्यांनी भाजपला केलं आहे. 

गटप्रमुख हे माझे वैभव असून मुख्यमंत्रीपद गेल तरीही इतकी गर्दी झाली. हे माझ वैभव आहे. त्यामुळे शिवसेना जे बोलते ते करते आणि जे केलंय तेच तुम्हांला घरोघरी जाऊन सांगायचय. शाळांमध्ये अमुलाग्र बदल केले, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केल्या. व्हर्च्युअल क्लासरुम ही संकल्पना पहिली मुंबईत सुरू केली.  आपली पंचाईत ही होते की आपण जे करतो त्याची जाहिरात करत नाही... केजरीवाल यांचही मी कौतुक करतो... 

माझा न्यायालयावर विश्वास आहे. म्हणतात न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. आजही न्यायाधिश प्रभूणे यांच्या सारखे न्यायाधिश आजही आहेत. येणारा निकाल हा लोकशाहीसाठी महत्वाचा असणार आहे. 

आर्थिक केंद्र मुंबईतून पळवता प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाच कसा? शिवसेना म्हणजे आधार, विश्वास, विकास भाजपचा वंश कोणता बावनकूळे की एकशे बावन कूळे...मिंधे गट दिल्लीत मुजरा करायला गेला. मुंबईत संकट येते तेव्हा शिवसेनाच धावून जाते ही सभा तर झाकी, दसरा अजून बाकी आहे...निवडणूका आल्या की भाजपला मुंबई आठवते...

माझ्या घराण्याचा मला अभिमान आहे... हे मी मुद्दाम सांगत आहे. कारण  तुम्हाला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील घडामोडी माहित हव्या.. त्यावेळी जनसंघ हा समिती फोडणारा, ही त्यांचीच औलाद आहे. आमची पंचवीस वर्ष ही युतीमध्ये सडली आहेत, कुजली. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. विनासायास यांना उपमहापौर पद मिळालं. मेहनत करायची शिवसैनिकांनी....  वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान पण  तुमचा वंश कुठला? सगळे बाहेरचे घेतले भरले. वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान..  तुमचा वंश कुठला?, असा सवालही ठाकरेंनी भाजपला केला.

आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा बाहेर काढू -  मुंबई संकटात असताना तेव्हा हे  कुठे असतात? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही येता. ही तुमच्यासाठी रिअल इस्टेटमधील पर स्क्वेअर फुटप्रमाणे विकायची जमीन आहे का? मात्र ही आमच्यासाठी मातृभूमी आहे... आमची आई आहे... या आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावले...

मुंबईवर लचके तोडणारी गिधाड अन् त्यांची औलाद फिरातेय - उद्धव ठाकरे                                                                                            मुंबईंवर लचके तोडणारी गिधाड, त्यांची औलाद फिरायला लागली असून शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिल शहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आलेले होते... आताही त्या कुळातील येऊन गेले. अमित शाह म्हणाले, शिवसेनेला जमीनीवर आणू... पण तुम्हीं प्रयत्न तर कराच, तुम्हांला आम्हीं आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही...

बाप पळवणारी औलाद राज्यात :  संजय राऊत म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. मुले पळवणारी टोळी पाहिली पण बाप पळवणारी औलाद पहिल्यांदाच राज्यात पाहिली -  उद्धव ठाकरे

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांने, भगिनींनो आणि मातांनो..आज हे एवढं आहे. दसऱ्याला किती असणार...दसरा हा शिवतिर्थांवरच होणार व्यासपीठावर संजय राऊतांची खुर्ची दिसली...नाहीतर कुणी म्हटलं असत ते मिंधे गटात गेले, असा खोचक टीका ठाकरेंनी केली. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात...

शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेत आहेत. ठाकरे यांच्या आजच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून ते गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्ताने आणि मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. यामुळे या दसरा मेळाव्याआधी होणाऱ्या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.