उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन; तुम्हीच मुख्यमंत्री व्हा,पण शिंदेंना सोडा

Uddhav Thackeray| Devendra Fadanvis एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
Uddhav Thackeray| Devendra Fadanvis
Uddhav Thackeray| Devendra Fadanvis

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. भाजपाशी (BJP) युती करत एकनाथ शिंदेंनी राज्यात सत्ता स्थापन केली. सुरुवातीला शिवसेना (Shivsena) आमदारसोबत घेऊन बाहेर पडलेल्या शिंदेंना हळुहळु राज्यभरातून नगरसेवक, पदाधिकारी आणि त्यानंतर आता खासदारांचाही पाठिंबा वाढू लागला. या सर्वात आता पुन्हा एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोर आमदार परत येणार नाहीत, अशी खात्री पटल्यामुळे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला होता. "मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण शिंदेंना सोडा, अशी ऑफर त्यांनी फडणवीसांना दिल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

Uddhav Thackeray| Devendra Fadanvis
सदाभाऊ खोत म्हणाले, दोनच माणसं व्यवस्थित वाढत असतील तर 40 माणसांची गरज काय?

नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधी उद्धव ठाकरेंनी फडवीसांना फोन केला होता, असे वृत्त 'साम' वाहिनीने दिले आहे. पण आता एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. आता ही वेळ निघून गेली आहे, उशीर झालाय," असं उद्धव ठाकरेंना भाजपकडून सांगण्यात आलं. या फोनसंदर्भात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना विचारले असता, ते म्हणाले की, यासंदर्भात आम्हाला माहिती नाही. त्यामुळे आम्ही त्याचावर बोलणार नाही. आणि आम्हाला याविषयी फडणवीसांनीही काही सांगितले नाही. तसेच, अद्याप भाजपकडूनही यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

बंडखोरी दरम्यानही या चर्चा झाल्याच्या अफवा ...

दरम्यान, बंडखोर आमदार गुवाहाटीत असतानाही २० जून नंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे डॅमेज रोखण्यासाठी अनेकदा फडणवीस आणि भाजप पक्षश्रेष्ठींना फोन केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या फोनवरुन देवेंद्र फडणवीसांना फोन करत पक्षात होणाऱ्या फुटीपेक्षा, गुवाहाटीत असलेले आणि मुंबईत राहिलेले आमदारांचे विभाजन न होता, हे सर्व एकत्र येऊन भाजपसोबत पुन्हा शिवसेनेची युती होते का? यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मात्र तेव्हाही शिवसेनेने या अफवा असल्याचे सांगत धु़डकावून लावल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in