त्याकाळात यांच्या हालचाली जोरात होत्या; ठाकरेंनी सांगितला थरारक अनुभव

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखती दिली आहे.
Uddhav Thackeray latest marathi News
Uddhav Thackeray latest marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखती दिली आहे. 'सामना'चे कार्यकारी संपादक शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

ते म्हणाले, हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती, त्याच काळात तुमच्या हालचाली जोरात होत्या" मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, मात्र, माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. नंबर दोनचे पदही दिले होते. पक्ष सांभाळण्यासाठी विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात केला. मी रुग्णाल्यामध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या त्याही पक्षाच्या विरोधात, अशी खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

Uddhav Thackeray latest marathi News
पालापाचोळा म्हणजे ठाणेकर नव्हे... उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहे. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते डॉक्टरांना विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना होती. मात्र, ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी बरा होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की जिना चढायचाय.

सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला इतक्यात मानेत एक 'क्रॅम्प' आला त्यामुळे माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. श्वास घेताना माझे पोटही हलत नव्हते. मी पूर्णपणे निश्चल झालो होतो. त्यावेळी एक 'ब्लड क्लॉट' आला होता. डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला 'गोल्डन अवर' म्हणतात, त्यामध्ये ऑपरेशन झाले म्हणून मी तुमच्यासमोर आहे.

Uddhav Thackeray latest marathi News
सीएम, डीसीएम यांच्यासाठी भरघोस अधिकारी-कर्मचारी

त्यावेळी माझे हातपाय आणि बोटेही हलत नव्हती, तेव्हा टेन्शन होते की डास चावला, मुंगी चावली तर खाजवायचे कसे? हाही एक विचित्र भाग होता. त्या काळात माझ्या कानावर येत होते की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते. मात्र, काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत. तेव्हा पसरवले जात होते की, हे आता काही उभे राहात नाही. आता आपले काय होणार? तुझे काय होणार, ही चिंता त्यांना होती, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in