वाढदिवसानिमित्त तुळजाभवानी मंदिरात अर्पण करण्याच्या चांदीच्या पादुकांची उद्धव ठाकरेंनी केली पूजा

Uddhav Thackeray|Shivsena : लवकरच या पादुका भवानी मातेला अर्पण करण्याचा संकल्प डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केला आहे.
Uddhav Thackeray & Nilam Gorhe Latest News
Uddhav Thackeray & Nilam Gorhe Latest News Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (27जुलै) 62 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान, आज 'मातोश्री'वर शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिरात अर्पण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चांदीच्या पादुकांचे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पूजा करून वंदन केले. लवकरच या पादुका भवानी मातेला अर्पण करण्याचा संकल्प डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केला आहे. (Uddhav Thackeray & Nilam Gorhe Latest News)

Uddhav Thackeray & Nilam Gorhe Latest News
भाजप खासदाराचे घर आणि अकोला-पूर्णा रेल्वे बॉम्बने उडवण्याची धमकी !

काल ( २६ जुलै) रोजी पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. गोऱ्हे यांनी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केलेल्या महाआरतीचा प्रसाद मंदिराचे विश्वस्त महेश सूर्यवंशी यांनी ठाकरे यांच्यासाठी दिला होता. तोही आज ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मनोभावे ग्रहण केला असल्याची माहिती त्यांनी दिली. याबरोबरच महाआरतीच्या निमित्ताने पुण्यात खास तयार केलेला सव्वा किलोचा विशेष मोदकही यावेळी डॉ. गोऱ्हेंनी ठाकरे कुटुंबियांना दिला.

उद्धव साहेबांना उदंड आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे. शिवसेनेची वाटचाल अधिक दिमाखदार होवो, अशा शुभेच्छाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे यांना दिल्य.याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही दिली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त राज्यभरातून अनेक राजकीय, सामिजिक व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ''महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....'', अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या.

तर फडणवीस यांनी "माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो!", अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या मात्र, यावेळी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणे त्यांनी टाळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in