राऊतांवरील कारवाईवर उद्धव ठाकरे बोलणार ; तीन वाजता पत्रकार परिषद

Uddhav Thackeray| Sanjay Raut| शिवसेना परिवार म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी; ठाकरेंचा राऊतांच्या मातोश्रींना शब्द
Uddhav Thackeray| Sanjay Raut|
Uddhav Thackeray| Sanjay Raut|

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक केल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राऊत यांच्या मैत्री या निवास्थानी जाऊन त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी खासदार अरविंद सावंतही त्यांच्यासोबत होते.

काही मिनिटेच त्यांनी संजय राऊत यांच्या मातोश्री आणि इतर कुटूंबियांची भेट घेतली. भेटीदरम्यान, त्यांनी, संजय राऊत एकटे नाहीत, शिवसेना परिवार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. असा शब्द दिला. त्यानंतर काही मिनिटातच ते मातोश्रीकडे रवाना झाले. राऊत कुटूंबियांच्या भेटीनंतर आज दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे राऊतांवरील ईडीच्या कारवाईवर उद्धव ठाकरे काय बोलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Uddhav Thackeray| Sanjay Raut|
Ashok Chavan : चर्चा कोण करतयं, असे म्हणत चव्हाणांकडून चिखलीकरांची खिल्ली..

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अशात राऊत यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. राऊत सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर टीका करत असल्याने त्यांच्यावर खोटी कागदपत्रे तयार करुन त्यांना अटक करण्यात आली, सुडापोटी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केला आहे. (Sanjay Raut ED Enquiry latest news)

काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळेच आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

शिवसेनेतेची मुलूखमैदान तोफ, खासदार संजय राऊत यांनी ईडीनं अटक केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. आज राज्यभर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राऊतांच्या अटकेवर राज्यभरातून सत्ताधाऱ्यासह विरोधकांकडून प्रतिक्रिया येताना दिसत आहे. राऊत यांना ताब्यात घेतल्याचे पडसाद महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण देशभरात उमटताना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in