Shivsena : उध्दव ठाकरे अॅक्शन मोडवर..घेणार महाराष्ट्राचा आढावा...तारीखही ठरली!

Shivsena : पराभूत उमेदवारांनी हजर रहावे, असे सांगण्यात आले आहे.
Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) विस्तारासाठी राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. (Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News)

यासंदर्भात दिवाळी संपताच ३१ ऑक्टोबरपासून या बैठकांना प्रारंभ करणार होणार असून या बैठकांना खासदार, आमदार, जिल्हासंघटक, जिल्हाप्रमुख, महिला आघाडीप्रमुख, युवासेनाप्रमुख तसेच त्या-त्या मतदारसंघातले पराभूत उमेदवारांनी हजर रहावे, असे सांगण्यात आले आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
ऊसदराच्या मागणीसाठी मंगळेढा आणि पंढरपुरात ऊस वाहतूक रोखली...

३१ ऑक्टोबर रोजी परभणी, जालना, बुलढाणा, अकोला तर १ तारखेला संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, बीड या जिल्ह्यांची बैठक होईल. २ नोव्हेंबर रोजी धाराशिव, यवतमाळ, लातूर, अमरावतीविषयी चर्चा होईल, अशी माहिती मिळत आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Tata Airbus : गुजरातला वेगळा देश निर्माण होणार आहे का... सतेज पाटलांचा सवाल

नाशिक दिंडोरी धुळे नंदूरबार या जिल्ह्यांबाबत ३ तारखेला चर्चा होईल. या बैठकीनंतर ४ ते एकादशी तुळशी विवाहानिमित्त चार दिवस चर्चा बैठका होणार नाहीत. ७ नोव्हेंबर रोजी जळगाव, रावेर, पुणे बारामती तर ८ नोव्हेंबर रोजी शिरुर मावळ रत्नागिरी सिंधुदुर्ग तर ९ नोव्हेंबर रोजी पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे. तसेच १० रोजी कोल्हापूर, हातकणंगले, अहमदनगर, शिर्डी तर ११ नोव्हेंबर रोजी सांगली, माढा, सोलापूर, सातारा या ठिकाणांवर चर्चा होईल.

१२ नोव्हेंबरला रामटेक नागपूर भंडारा गोंदिया आणि १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली चंद्रपूरवर चर्चा होईल .

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाची झाली असल्याने १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी याबाबत चर्चा होणार आहे. शिवसेनेसाठी या बैठका अत्यंत महत्वाच्या असून सर्व पदाधिकार्यांनी या बैठकीला आपापल्या भागाचा अभ्यास करुन हजर रहावे,असे कळवण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व बैठका मुंबईत मातोश्री या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in