सभांचा भोंगा : उद्धव ठाकरेंनी राज यांचे चॅलेंज स्वीकारले; फडणविसांनाही उत्तर देणार!

१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News, Raj Thackeray News, Maharashtra Politics news updates
Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News, Raj Thackeray News, Maharashtra Politics news updatessarkarnama

मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची १ मे रोजीचा बुस्टर डोसनंतर १५ मे रोजी मुंबईत (Mumbai) दुसरी मोठी सभा होणार आहे. भाजपचे (BJP) उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय पांडे (Sanjay pandey) यांच्याकडून गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये फडणवीस यांच्या या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची हिंदुत्ववादी भूमिका आणि उत्तर भारतीय मुद्द्यावर फडणवीस भाष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (The second Rally of Devendra Fadnavis has been organized)

Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News, Raj Thackeray News, Maharashtra Politics news updates
निवडणूक आयोगाची लगबग : 216 नगरपालिका, 25 ZP साठी मोठा आदेश

याशिवाय या सभेतील विशेष गोष्ट म्हणजे १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यातून फडणवीस ठाकरे यांच्या भाषणाला देखील प्रत्यूत्तर देण्याची शक्यता आहे. गत बुस्टर सभेत फडणवीस यांनी शिवसेना आणि शिवसेनेच्या हिंदुत्वावर खरपूस टीका केली होती. सोबतच ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दृष्टीने देखील ही सभा महत्वाची मानली जात आहे.

बुस्टर सभेत काय म्हणाले होते फडणवीस?

सोमय्या मैदानावर पार पडलेल्या सभेत फडणवीस म्हणाले होते, काही लोकांचा गैर समज आहे की, ते म्हणजेच महाराष्ट्र आणि मराठी आहे. त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान, असे त्यांना वाटते. मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो, लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जातीच्या 12 कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केला तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र आहे. त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान. तुम्ही म्हणजे, हिंदू नाही.. मात्र, मी हे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News, Raj Thackeray News, Maharashtra Politics news updates
'राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा'

सोबतच महाराष्ट्राच्या नावाला बंटा लावण्याचे काम तुमच्या सरकारमध्ये होत आहे, असा हल्लाबोलही फडणवीस यांनी केला. मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर तुमची हातभर फाटली, आणि सांगता मशिद पाडली. मी तो ढाच्या पाडण्यासाठी होतो. तुम्ही कुठे होतात. १८ दिवस मी जेलमध्ये होतो. बाबरी पाडली त्यावेळी महाराष्ट्रातील एकही शिवसेनेचा (Shivsena) नेता नव्हता, असेही फडणवीस म्हणाले. बाबरी पाडली त्यामध्ये ३२ आरोपी होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणताच शिवसेनेचा नेता नव्हता. आमचा दोष काय आहे तर आम्हला प्रसिद्ध करता येत नाही. ज्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तो कारसेवकांनी आणि राम भक्तांनी पाडला, असेही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com