Sharad Pawar Retirement News: मोठी घडामोड! शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर उध्दव ठाकरे 'सिल्व्हर ओक'ला जाणार...

Sharad Pawar Retirement as NCP President : भाकरी फिरवण्याचे संकेत होते. पण पवार साहेबांनी तवाच फिरवला...
 Uddhav Thackeray, Sharad Pawar .
Uddhav Thackeray, Sharad Pawar .sarkarnama

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांना मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.

यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गटाच्या नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, याचवेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) सिल्व्हर ओक या ठिकाणी भेट पवारांची घेणार असल्याचं समोर येत आहे.

 Uddhav Thackeray, Sharad Pawar .
Devendra Fadnavis : नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई; देवेंद्र फडणवीसांचं गडचिरोलीत भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच भावुक झाले. जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना अश्रू अनावर झाले. तसेच प्रत्येकानं पवारांच्या भूमिकेवर आपल्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

 Uddhav Thackeray, Sharad Pawar .
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी पक्षाच्या समितीने पवारांचे मनपरिवर्तन करावे; अशोक चव्हाणांचा आग्रह

संजय राऊत काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. राऊत म्हणाले, "गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. आज इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. पण शिवसैनिकांच्या प्रेमापोटी त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला.बाळासाहेबांप्रमाणेच पवारसाहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत." असे राऊतांनी ट्विट केले आहे.

शरद पवार भाकरी फिरवणार असे म्हणाले होते, तसे त्यांनी संकेत दिले होते. भाकरी फिरवण्याचे संकेत होते. पण पवार साहेबांनी तवाच फिरवला असंही राऊत म्हणाले.

 Uddhav Thackeray, Sharad Pawar .
Sharad Pawar Retirement: "भाकरी फिरवण्याचे संकेत पण तवाच फिरवला, इतिहासाची पुनरावृत्ती.." ; राऊतांचं सूचक ट्वीट

ही खटकणारी बाब...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णय़ावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले,राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण शरद पवारांसारख्या अनुभवी ज्येष्ठ नेत्याने अशाप्रकारे अचानक राजीनामा देणं, ही निश्चित खटकणारी बाब आहे.

विशेषत: केंद्रीय पातळीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन आगामी काळात भाजपाविरोधात आघाडी उभी करत असताना शरद पवारांची निवृत्ती घेणं, ही न पटणारी बाब आहे. त्यांनी असं करायला नको होतं, अशीच आमची भावना आहे. पण हा निर्णय त्यांचा अंतर्गत निर्णय असून काँग्रेस पक्ष त्यावर लक्ष ठेवून आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com