उद्धव ठाकरे राऊतांच्या कुटूंबियांची भेट घेणार

Uddhab Thackery|Sanjay Raut| पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे
Shivsena leader Sanjay Raut meets chief minister Uddhav Thackeray
Shivsena leader Sanjay Raut meets chief minister Uddhav ThackeraySarkarnama

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अशात राऊत यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या कुटूंबियांची भेट घेणार आहेत. राऊत सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर टीका करत असल्याने त्यांच्यावर खोटी कागदपत्रे तयार करुन त्यांना अटक करण्यात आली, सुडापोटी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केला आहे. (Sanjay Raut ED Enquiry latest news)

शिवेसनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी टीका बंडखोरी केल्याने ठाकरे सरकार कोसळले. तेव्हापासून संजय राऊत सातत्याने भाजप आणि शिंदे गटावर टीका करताना दिसत होते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन भाजप विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोपही राऊत यांच्यासह विरोधी पक्षांतील नेत्यांकडून होत आहे.

Shivsena leader Sanjay Raut meets chief minister Uddhav Thackeray
Sanjay Raut : राऊतांच्या अटकेचे राज्यसभेतही पडसाद ; शिवसेना आक्रमक

कॉंग्रेससह (Congress) राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) शिवसेना खासदार संजय राऊत यांना पाठींबा दर्शवण्यात आला आहे. विविध नेत्यांकडून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर सुडबुद्धीने केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी केली आहे.

शिवसेनेतेची मुलूखमैदान तोफ, खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी ईडीनं अटक केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. आज राज्यभर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राऊतांच्या अटकेवर राज्यभरातून सत्ताधाऱ्यासह विरोधकांकडून प्रतिक्रिया येताना दिसत आहे. राऊत यांना ताब्यात घेतल्याचे पडसाद महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण देशभरात उमटताना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in