PM मोदींच्या पुरस्काराकडे CM ठाकरेंची पाठ; शिवसैनिकांसाठी घेतला निर्णय

PM Narendra Modi | Uddhav Thackeray | shivsena : उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींच्या स्वागताकडेही पाठ
Cm Uddhav Thackeray|Pm  Narendra Modi|
Cm Uddhav Thackeray|Pm Narendra Modi|

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मृतीमध्ये दिला जाणारा पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला आहे. आज (२४ एप्रिल) संध्याकाळी ६ वाजता मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी हे स्वत: उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदींसोबत यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे असे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार होते. मात्र आता या सोहळ्याकडे मुख्यमंत्री ठाकरे पाठ फिरवणार असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यास उद्धव ठाकरे गैरहजर रहाण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांच्या संघर्षाचा अपमान म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. तसेच हा पुरस्कार सोहळा सरकारी कार्यक्रम नसून खासगी कार्यक्रम आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यास राजशिष्टाचाराचेही बंधन नाही.

Cm Uddhav Thackeray|Pm  Narendra Modi|
मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला जाणार नाहीत?

मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपाय यंत्रणा, राणा दाम्पत्य संघर्ष, भाजप नेते मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्यावरील झालेला हल्ला यामुळे मुंबईतील रस्त्यांवर शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यावेळी संपूर्ण घडामोडींदरम्यान शिवसैनिकांनी मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाच्या संरक्षण आणि सन्मानासाठी जीवाची बाजी लावून दिवस-रात्र आंदोलनं आणि निदर्शेने केली. आता याच शिवसैनिकांच्या संघर्षाचा अपमान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेणार असल्याची माहीती मिळत आहे.

Cm Uddhav Thackeray|Pm  Narendra Modi|
घरकुल योजनेतील सदनिकांचा गैरवापर, अनेकांनी भाड्याने दिल्या, तर काहींनी विकल्या

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वाागतालाही मुख्यमंत्री ठाकरे जाणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. इतकेच नव्हे तर राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेही त्यांच्या स्वागताला जाणार नसल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जाणार आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता मोदी-ठाकरे यांच्यातील अंतर वाढले आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com