'उद्धव ठाकरेंनी आज बाळासाहेबांसारखा निर्णय घेतला'

Uddhav Thackeray|Shivsena|Deepak Kesarkar : शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Deepak Kesarkar News, Uddhav Thackeray Latest Marathi News, Political News, Shivsena News, Rajkiya Batmya
Deepak Kesarkar News, Uddhav Thackeray Latest Marathi News, Political News, Shivsena News, Rajkiya Batmya sarkarnama

Deepak Kesarkar : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म (Draupadi Murmu) यांना दिलेल्या पाठिंब्याच्या निर्णयाचे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्वागत केले आहे.

हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असून उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा बाळासाहेब यांच्या सारखाच पक्षाच्या पलिकडे जाऊन घेतलेला निर्णय आहे. त्यांमुळे त्यांचे मी अभिनंदन करतो, अशा शब्दात केसरकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते उद्या दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला केसरकर जाणार आहेत. त्यापुर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. (Deepak Kesarkar & Uddhav Thackeray Latest News)

Deepak Kesarkar News, Uddhav Thackeray Latest Marathi News, Political News, Shivsena News, Rajkiya Batmya
मुर्मू यांना सेनेचा पाठिंबा : महाविकास आघाडी फुटणार?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठींबा देण्याचे जाहीर केल्याने मला आनंद झाला आहे. त्यांनी अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखाच पक्षाच्या बाहेर जात निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांचे शिंदे गटाच्या वतीने केसरकरांनी ठाकरेंचे अभिनंदन केले. तसेच बुधवारी (ता.13 जुलै) दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी मला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केल्याचे सांगत हा दिलेला मान खरोखरच माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.(Uddhav Thackeray Latest Marathi News)

Deepak Kesarkar News, Uddhav Thackeray Latest Marathi News, Political News, Shivsena News, Rajkiya Batmya
खासदार हेमंत पाटील ‘या’ कारणामुळे मातोश्रीवर उशिरा पोहोचले...

ठाकरे यांनी आज स्वत: पत्रकार परिषदेत मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला होता. ते यावेळी म्हणाले होते की, गेल्या चार ते पाच दिवसांत आदिवासी आणि त्या समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी विनंती केली आहे. त्यामध्ये एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, अमशा पडवी, निर्मला गावित, पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आल्या होत्या. याबरोबरच एसटी-एससी समाजातल्या लोकांनी विनंती केल्याने आणि पहिल्यांदाच आदिवासी समाजातल्या व्यक्तीला राष्ट्रप्रमुख बनण्याची संधी मिळत असल्याने आपण त्यांना हा पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, ठाकरे यांनी आज घेतलेल्या या निर्णयावर कॅाग्रेस नेते बाळासाहेब थोरात य़ांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर ठाकरेंच्या या निर्णयामुळे भाजप सोबतची चर्चेची दारं अजूनही उघडी असल्याचे बोललं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in