Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा दावा सहा, आयोगाकडे गेले चार : दोन खासदार गेले कुठे?

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे दोन खासदार फुटले का? ठाकरेंना धक्क्यावर धक्के
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackeray : मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकूण १८ खासदार होते. पोटनिवडणुकीत दादरा नगर हवेलीत कलाबेन डेलकर या १९ वे खासदार म्हणून निवडून आले.शिवसेनेतल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत यापैकी १२ खासदार गेले. १ खासदार नंतर शिंदे गटात सामील झाले. यामुळे ठाकरे गटाकडे सहा खासदार राहिल्याच्या दावा त्यांच्याकडून केला जात होता. मात्र, या सहापैकी आयोगाला प्रत्यक्षात ठाकरे गटाचे चारच खासदारांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. यामुळे राहिलेले दोन ठाकरेंचे खासदार फुटले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Uddhav Thackeray
Thackeray Vs Shinde : शिवसेनेकडे उरले चारच खासदार; प्रतिज्ञापत्र देण्याचे टाळलेले पाचवे खासदार कोण?

ठाकरे गटातच राहून त्यांच्या एका खासदाराने शिंदेंना प्रतिज्ञापत्र दिले आहे का? अशी चर्चा होत आहे. यामुळे आधीच उद्धव ठाकरे अडचणीत असताना, त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यांचा आणखी एक खासदार बेपत्ता झाल्याने ठाकरे गटात खळबळ माजली आहे. यामुळे आता हे दोन खासदार शिंदे गटात जाण्याची प्रतीक्षा करत होते का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.

निवडणूक आयोगाकडे पक्षाचे बलाबल सादर केले जाते. सादर केलेल्या कागदपत्रांनुसार आयोगाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे सदस्य किती, बलाबल कोणाचे किती, याची सविस्तर माहिती दिली जाते. यानुसार शिंदेंकडे विधानसभेत ५५ पैकी ४० आमदार आहेत. तर ठाकरे गटाकडे ५५ पैकी १५ आमदार आहेत. तर विधान परिषदेत शिंदेंच्या खात्यात शून्य आणि ठाकरेंजवळ १२ पैकी १२ आमदार आहेत.

Uddhav Thackeray
Shivsena Symbol : शिवसेनेची कार्यकारणी लोकशाहीला धरूनच ; ठाकरेंच्या खासदाराचा दावा!

दुसरीकडे लोकसभेत मात्र एकूण १९ खासदारांपैकी शिंदे गटाकडे १३ एवढी संख्या तर ठाकरे गटाकडे केवळ चारच खासदार आहेत. मात्र ठाकरे गटाने आपल्याकडे सहा खासदार असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात आयोगाकडे केवळ चारच खासदारांचीच प्रतिज्ञापत्रे सादर झाली आहेत. यामुळे दोन खासदारांनी प्रतिज्ञापत्र सादर का सादर केले नाही? ते हा शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com