ठाकरेंनी फडणविसांना धुतले : तुमच्या वजनाने बाबरी मशीद पडली असती...

Uddhav Thackeray live : षंढासारखे लढू नका. केंद्रीय संस्थांचा वापर करणे न सोडल्यास धडा शिकवू
 Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईत झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. (Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis)

फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडताना तेथे होतो, या दाव्याची ठाकरे यांनी खिल्ली उडवली. बाबरी पाडली तेव्हा मी, होतो असे देवेंद्रजी म्हणाले. ती तुमच्या काय शाळेची सहल होती काय? तुमचं वय काय तुम्ही बोलता किती. तुम्ही खरच तिथे गेला असता आणि वर चढायचा प्रयत्न केला असता तर तुमच्या वजनाने बाबरी खाली आली असतीे. तुम्ही एक पाय टाकला असता तर बाबरी खाली आली असती. तुमचं वय काय बोलता काय?

त्यांचे इतर मुद्दे पुढीलप्रमाणे

-सात पैशांनी पेट्रोल महागले तेव्हा अटल बिहारी वाजपेयी संसदेत बैलागाडीतून गेले होते. आता कुठे गेली तुमची ती संवेदनशीलता. हे म्हणतात शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही. मग ही कुणाची आहे. तुमचा भाजप तरी आता अटलजी व आडवाणींचा राहिला आहे का? -

-आम्ही काँग्रेससोबत गेलो ते उघड गेलो. तुमच्या सारखा पहाटेचा शपथविधी नाही केला. तो पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते.

-केंद्र सरकार मराठीला अभिजात दर्जा आजही देत नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभाषा आहे. छत्रपती नसते तर आज तुम्ही देखील भोंग्यात बसलेले असता. त्या छत्रपतींच्या मातृभाषेला तुम्ही दर्जा देत नाही, असं करंट सरकार केंद्रात बसलं आहे.

 Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
केतकी चितळेवर राज ठाकरे चिडले; अशांचा छडा लावून नीट बंदोबस्त करावा..

-स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पण हे यांना बघवत नाहीए. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ठीक नाही असं भासवलं जातंय. झेड सुरक्षा असलेल्या व्यक्तीवर हल्ला झाला हे फोटो दाखवले जातेय. पण त्या व्यक्तीला टॉमेटो सॉस कुणी दिला?

-आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत.

-आमचे हिंदुत्व म्हणजे देवळात घंटा बडविणारे नाहीतर अतिरेक्यांना तुडविणारे आहे. ज्यांनी घंटा बुडविल्या त्यांना काय मिळालं घंटा? ज्यांना महाराष्ट्र काय आहे हे कळलं नाही त्यांच्यासाठी बोलावे लागत आहे.

- खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेले पक्ष आपल्या सोबत होता. तो देशाची दिशा बदलत आहे.

 Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर झाले नतमस्तक... सभेची मने जिंकली

- एक मे रोजी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस हे चुकून खरे बोललो. मुंबई स्वतंत्र करणार, असल्याचे त्यांच्या मालकांचे म्हणणे असल्याचे ते बोलून गेले. पण तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी ती तुम्हाला हिरावून घेता येणार नाही. जो कोणी या मुंबईला वेगळा करायचा प्रयत्न करेल त्याचे तुकडेतुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

-मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कोणी मागितली? मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय करणार? मुंबई काय पारतंत्र्यात आहे?


Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com