Uddhav Thackeray Vs BJP : भाजपच्या धडाडत्या तोफा अचानक ठाकरेंवर का वळल्या ? इंडिया आघाडीतील वाढतं महत्व,पंतप्रधानपदाचा चेहरा की...

Maharashtra Politics : 'इंडिया'ची ही तिसरी बैठक भाजपने खूपच गांभीर्याने घेतली आहे.
Uddhav Thackeray Vs BJP
Uddhav Thackeray Vs BJPSarkarnama

Mumbai : राणे आणि ठाकरे हे हाडवैरी आहेत. त्यातून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या भाषेत शिवराळ टीका करत असतात. त्यांची अनेकदा जीभही घसरलेली आहे. त्यातही इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर राणेंकडून ठाकरेंवर अधिक जोरदार प्रहार करण्यात येत आहेत.

आता त्यांच्याजोडीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्याही निशाण्यावर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आले आहेत. एकूणच त्यांनी चौफेर टीका ठाकरेंवर सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी शिंदे शिवसेनेचेही मदत घेतली आहे. त्यामागे ग्यानबाची मेख आहे.

Uddhav Thackeray Vs BJP
MNS Vs Shivsena UBT : '' राज्यात दुष्काळसदृश स्थिती अन् नेत्यांना...'' ; 'इंडिया'च्या 'मेन्यू'वरुन मनसे - ठाकरे गटात 'ट्विटर वॉर' पेटलं !

केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधातील २८ राजकीय पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक गुरुवार, शुक्रवारी मुंबईत बैठक होत आहे. त्यामुळे भाजपकडून आघाडी व त्यातील नेत्यांना लक्ष्य केले जात आहे.त्यातही शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने चौफेर टीका सुरु केल्याचे ठळकपणे दिसून येत आहे.

...म्हणून भाजपने 'इंडिया'ला घेतले रडारवर!

देशातील प्रमुख २८ राजकीय पक्षांचे ६३ नेते मुंबईतील इंडियाच्या बैठकीसाठी आले आहेत.यानिमित्ताने गेल्या साडेनऊ वर्षात प्रथमच एवढी मोठी दमदार विरोधकांची एकी झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या एकीचा फायदा प्रथम विधानसभा निवडणुकीत दिसला. तो लोकसभा निवडणुकीला दिसू नये म्हणून भाजपने 'इंडिया'ला रडारवर घेतले आहे.

Uddhav Thackeray Vs BJP
Dhananjay Munde Rakshabandhan: 'पाणी डोळ्यात तुझ्या जिव माझा जाई' ; मुंडे भगिनींनी राखी बांधल्यानंतर धनंजय मुंडेंच्या भावना

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा २०२४ ला जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.त्यात इंडिया आघा़डी आणि पर्यायाने ठाकरे हे मोठा अडसर आहेत. तसेच ते मुख्य आयोजक असलेल्या मुंबईतील इंडियाच्या बैठकीतून हा अडसर आणखी मजबूत होणार असल्याने ठाकरेंवर भाजपने चौफेर टीका सुरु केली आहे.

ठाकरेंना लक्ष्य हा त्याचाच एक भाग...

याअगोदरच्या इंडिया(INDIA) आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने भाजपच्या टार्गेटवर उद्धव ठाकरे नव्हते. ते नेमके इंडियाच्या मुंबईच्या बैठकीनिमित्त आले आहेत,हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे इंडियाची ही तिसरी बैठक भाजपने खूपच गांभीर्याने घेतली आहे. आतापासून संभाव्य डॅमेज कंट्रोल सुरु केले आहे. ठाकरेंना लक्ष्य हा त्याचाच एक भाग आहे.

Uddhav Thackeray Vs BJP
INDIA Alliance Meeting : ‘इंडिया’ आघाडीसाठी वंचित इच्छुक; पण निमंत्रणच नाही, तर कसे जाणार?

एनडीएची बोलावलेली बैठक हा त्याचा दुसरा पार्ट आहे.उद्धव ठाकरे हे इंडियाच्या तिसऱ्या बैठकीचे यजमान आहेत. त्यांनीच त्यासाठीची सर्व व्यवस्था केल्याने आपल्याविरोधाच जनमताचा विरोध वाढत चालल्याची भाजप(BJP)ची धारणा झाली आहे.तो काहीसा शांत करण्याच्या हेतूने तसेच आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ध्यानात घेऊन घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत दोनशे रुपयाने भाजपच्या केंद्र सरकारने नुकतीच घट केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in