राणे म्हणतात, ''अजितदादांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या''

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे मानेच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल आहेत. आठवड्यापासून ते रूग्णालयात उपचार घेत आहे. भाजपचे नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी टि्वट करीत त्यांना टोला लगावला आहे.
राणे म्हणतात, ''अजितदादांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या''
ajit pawar, nilesh ranesarkarnama

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे मानेच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल आहेत.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, जवळपास एक आठवड्यापासून ते रूग्णालयात उपचार घेत आहे. यावरुनच भाजपचे नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी टि्वट करीत त्यांना टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज सोपवण्याची मागणी राणेंनी केली आहे.

आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात, ''मुख्यमंत्री आजारी आहेत तर त्यांनी किमान चार्ज डेप्युटीला दिला पाहिजे, चार्ज सोडत नाही कारण त्यांना कोणावरही विश्वास नाही. महाराष्ट्राला नावाचा ही मुख्यमंत्री नाही हे बरोबर नाही, महाराष्ट्राचे प्रश्‍न बिकट होत चाललेत, लोकांची परिस्थिती बिघडत चालली आहे, कधी तरी राज्याचा विचार करा.''

मुख्यमंत्री ठाकरे यांना मानदुखीचा त्रास वाढल्याने १० नोव्हेंबर रोजी रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शुक्रवारी, १२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

ajit pawar, nilesh rane
राणेंचा सुपडा साफ ; उदय सामंतांनी बाजी मारली, सहकार पॅनल विजयी

शस्त्रक्रिया होऊनही १० दिवस उलटले तरी मुख्यमंत्री हे रुग्णालयातच आहेत, याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती दिली. ''मुख्यमंत्री अजून पुढील ३ दिवस रुग्णालयातच असतील, त्यानंतरही त्यांना काही दिवस सक्तीची विश्रांती करावी लागेल, आपण स्वतः त्यांच्याशी फोनवर बोललो आहे,'' असे राऊत यांनी रविवारी माध्यमांना सांगितलं.

मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे त्याचा परिणाम हिवाळी अधिवेशनावर होण्याची दाट शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन नागपूर होत असते, पण मुख्यमंत्र्यांसाठी हे अधिवेशन मुंबईत घेण्याची शक्यता आहे. नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांची उपस्थित राहणार आहेत. मात्र आता याही कार्यक्रमाला ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in