Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; 'या' नेत्यावर एसीबीची कारवाई

Politics : ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

आता ठाकरे गटाचे नेते योगेश भोईर यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

योगेश भोईर हे ठाकरे गटाचे मालाड, कांदिवली पूर्व येथील माजी नगरसेवक आहेत. तसेच ते मागाठाणेचे उपविभाग प्रमुख आहेत. भोईर यांच्यावर 85 लाखांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.

Uddhav Thackeray
Pune News : कसब्याने पुण्यातील राजकीय गणित बदलणार; खडकवासल्यात तापकीरांचे टेन्शन वाढणार...

या प्रकरणी भोईर यांच्या घरी एसीबीने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. योगेश भोईर हे नगरसेवक असताना त्यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray
Akola : ‘सरकार समस्या क्या सुलझाए`, सरकारही एक समस्या है’, शेतकरी संघटना आक्रमक !

दरम्यान, काही दिवसांपूर्वी योगेश भोईर यांच्यावर खंडणीचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना खंडणीच्या आरोपांखाली अटकही झाली होती. आता पुन्हा एकदा एसीबीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com