माझं काही तुंबलेलं नाही पण चौदा मे रोजी अनेकांचा मास्क काढेल : ठाकरेंचा सूचक इशारा

समुद्रापासून पाणी मिळविण्याच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन
माझं काही तुंबलेलं नाही पण चौदा मे रोजी अनेकांचा मास्क काढेल : ठाकरेंचा सूचक इशारा
Uddhav and Aditya ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सूचक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. सर्वांसाठी पाणी या मुबंई महापालिकेच्या (BMC) योजनेच्या उदघाटन प्रसंगी त्यांनी पालिकेच्याा कामाचे कौतुक करत येत्या 14 तारखेला अनेकांचा मास्क काढणार असल्याचा इशारा दिला. माझं काही तुंबलेलं नाही असे सांगतानाच मला मनातील बोलायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Uddhav Thackeray latest news)

उद्धव ठाकरे हे येत्या 14 मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. मनसेप्रमुख राज यांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्याच मैदानावरून उद्धव त्यांना उत्तर देणार आहेत. या सभेचा संदर्भ उद्धव यांच्या आजच्या बोलण्याला होता.

Uddhav and Aditya Thackeray
अजित पवारांनी नाशिकच्या भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला!

ते म्हणाले की राजकारण जरूर करा. पण त्यात एक दर्जा असला पाहिजे. नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी पक्ष नाही. सरकार चागले काम केले तर सांगणे ही दिलदारी आहे. पण आता ती दिसत नाही. निवडणुका आल्या की थापांचा पूर येतो. बाकीच्या थापा मारणारे अनेक आहेत, पण चांगलं काम केल्यानंतर कौतुकाची थाप मारणारे खूप कमी आहेत. 14 मे रोजी माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं तुंबलेलं नाही. पण मनात काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे.

मी मुंबईतच जन्माला आलो. मुंबई बदलत चालली आहे. आता एकच तिकीट बेस्ट, रेल्वे, मेट्रो या सगळीकडे चालेल. फक्त निवडणूक सोडून. बससेवा ही आपली रक्त वाहिनी आहे. महापालिकेच्या शाळेत शिकतो असे सांगितले की आधी नाक मुरडली जायची. पण आता अभिमानाने सांगण्याची वेळ आली आहे, अशी कामगिरी मुंबई महापालिकेने केली आहे. सीबीएसई आणि इतर बोर्ड आपण महापालिकेच्या शाळेत आणत आहोत. दिल्लीत ही गोष्ट असेल तर ते राज्य आहे, आपली महानगरपालिका ही गोष्ट राबवत असल्याने देशातील अशी पहिली महापालिका आहे.तहानलेला आहे त्याला पाणी देण्याचे काम आपण करत आहोत.

Uddhav and Aditya Thackeray
''मी असेपर्यंत मुख्यमंत्रीपद...'': उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शिवसैनिकांकडे 'ही' इच्छा

हल्ली पर्यावरणाच्या आपण गोष्टी करतो. पण हल्ली विचारांचे प्रदूषण होत आहे. मुंबई तुंबली की लगेच दाखवले जाते. पण हे नळाचे पाणी नाही दाखवणार. आरोग्याच्या सर्व तपासण्या आपण मोफत सुरू करणार आहोत. अनेकांना तपासण्या परवडत नाही. त्यामुळं त्यांच्यासाठी आरोग्य तपासण्या सुरू करत आहोत.

गेल्या काही दिवसांपासून माणसात आल्यासारख वाटत आहे. मी माईक समोर मास्क काढला आहे. तसा मास्क मी 14 तारखेला काढणार आहे, कारण हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. मी पाणी गढूळ करु पाहत नाही. पाणी देण्याच्या कार्यक्रमात मला राजकारण आणायचं नाही," असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.