Uddhav Thackeray Latest Marathi News
Uddhav Thackeray Latest Marathi Newssarkarnama

खरी शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेवर दावा केला आहे, त्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका केली

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच मुलाखती दिली आहे. 'सामना'चे कार्यकारी संपादक शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

Uddhav Thackeray Latest Marathi News
त्याकाळात यांच्या हालचाली जोरात होत्या; ठाकरेंनी सांगितला थरारक अनुभव

निवडणूक आयोगासमोर नवा खटला उभा राहतो आहे. तो म्हणजे धनुष्यबाण कोणाचा? असा प्रश्न राऊत यांनी विचारला त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला अजूनही देशाच्या घटनेवर, कायद्यावर विश्वास आहे. चोरीमारी सगळीकडे चालते असे नाही. नाहीतर तुम्हाला 'सत्यमेव जयते' हे वाक्य पुसावे लागेल आणि दोन वाक्य करावी लागतील एकाची. एक तर असत्यमेव जयते, दुसरे सत्तामेव जयते. त्यामुळे सत्तामेव जयतेसमोर असत्य घेऊन तुम्ही जाणार असाल तर लोक ते मान्य करणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray Latest Marathi News
ही तर शिवसेनेला गिळायला निघालेली औलाद ; बंडखोरावर ठाकरे संतापले...

पुढील प्रश्न विचारताना राऊत म्हणाले, हे दुर्देव आहे महाराष्ट्रचे असे मला वाटते पण आज अशी वेळ आणली आहे की ठाकरेंना पुरावे द्यावे लागतात शिवसेना खरी किंवा खोटी, असे म्हटले. त्यावर माजी मुख्यमंत्र्यांनी म्हणाले, लोक वाट बघतायत निवडणुकांची. आम्हाला पुरावा देण्याची गरज नाही. निवडणुका येऊ दे यांनाच पुरुन टाकतो, असे लोक म्हणतात. जनताच त्यांना राजकारणात पुरुन टाकेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com