जे काही बोलायचे आहे, ते दसरा मेळाव्यात बोलणारच; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

वाहतुक सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे ११ हजार प्रतिज्ञापत्रे सादर केली
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : आज तुम्ही ११ हजार प्रतिज्ञापत्रे सोपविली आहेत. ही तर केवळ सुरूवात आहे. मला एवढी प्रतिज्ञापत्रे पाहिजे की, तिकडे पुरावे सादर करण्यासाठी तुमच्या वाहतूक सेनेची मदत घ्यावी लागेल, असे आवाहन शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी (ता.४) मातोश्री येथे वाहतूक सेनेकडून ११ हजार निष्ठेची प्रतिज्ञापत्रे सोपविण्यात आली. यावेळी त्यांच्याशी अनौपचारिक बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यभरातील ट्रक, टेम्पो कमी पडतील एवढी प्रतिज्ञापत्रे मला मिळत आहेत. एवढी आपली सदस्य संख्या वाढत चालली, असल्याचा दावा यावेळी ठाकरे यांनी केला. बंडखोर गटाला न्यायालयात शह देण्यासाठी शिवसेनेकडून सध्या प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत.

Uddhav Thackeray
हिंमत असेल तर…समोर या; दानवेंचा गायकवाडांना इशारा

मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र जमा होत आहे, यामागे आपली सर्वांची मेहनत आहे. आपल्याकडे कुणी भाडोत्री माणसे नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. आहे ती सर्व भगव्यासाठी सर्वस्वी अर्पण करणारे आहेत. बाकी जे काही बोलायचे आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटाला इशारा दिला, तसेच सेनेचा दसरा मेळवा होणारच, असे संकेत दिले.

Uddhav Thackeray
मंत्री तानाजी सावंतांच्या स्वागतासाठी ३० किलोमीटरमध्ये तब्बल ६५ स्वागत फलक !

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'वाहतूक सेना म्हटल्यानंतर तुम्हाला रस्त्यांवरच्या खड्ड्यांची सवय असतेच. ते खड्डे तुम्ही पारही करता. मात्र, येथे जे राजकीय खड्डे पडलेले आहे. त्याला आपण सर्वजण मिळून बघूच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थित वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी 'आम्ही सगळे आपल्यासोबतच आहोत' अशी घोषणा केली. त्यावर ही जिद्द महत्त्वाची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगत सगळ्यांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in